टोमॅटोच्या दरात मोठी वाढ, अजूनही टोमॅटोचे दर वाढण्याची शक्यता, शेतकरी होणार मालामाल | Tomato Dar 

सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे टोमॅटोच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, सध्याच्या स्थितीमध्ये टोमॅटोचे दर गगनाला जाऊन भिडलेले असल्याने सर्वसामान्य नागरिकांना टोमॅटोच्या वाढलेल्या दरानुसार टोमॅटो खरेदी करणे अवघड होऊन बसलेले आहे, सध्याच्या स्थितीमध्ये प्रति किलो टोमॅटोला मिळत असलेला दर 80 रुपये एवढा असून येणाऱ्या काही दिवसातच अजूनही टोमॅटोचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे, यामध्ये टोमॅटो दर वाढल्याने शेतकऱ्यांचा एक प्रकारे फायदा qहोताना दिसतो कारण एरवी मात्र टोमॅटोला कवडी मोलदर मिळत असतो परंतु आता टोमॅटोचे दर वाढल्याने एक प्रकारे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल. 

 

एका महिन्यापूर्वीचा विचार करायचा झाल्या तर टोमॅटोचे दर फक्त 35 रुपये किलोवर होते परंतु आता ते दर वाढून 80 रुपये किलोवर येऊन पोहोचलेले आहे. टोमॅटो दर वाढण्याचे कारण म्हणजे फक्त यावर्षीच नाही तर प्रत्येक वर्षी सुद्धा टोमॅटोचे दर पावसाळ्यामध्ये वाढतात, कारण पाऊस आल्यामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते योग्य वेळेवर बाजारांमध्ये टोमॅटो पोहोचवला जाऊ शकत नाही तर अनेक भागात भूस्खलन यांसारख्या घटना घडत असल्याने अनेक भागात टोमॅटो विक्रीला नेला जाऊ शकत नाही, यामुळे दरामध्ये वाढ होण्याची शक्यता असते यावर्षी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.

 

हवामान विभागाच्या माध्यमातून काही ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता वर्तवलेली आहे, यासह मुसळधार पाऊस सुद्धा होणार तसेच देशांमध्ये हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात टोमॅटो उत्पादन घेतले जाते, टोमॅटो उत्पादन घेणारे हिमाचल प्रदेश हे मुख्य राज्य आहे परंतु असा राज्यात भूस्खलण्याची शक्यता असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान तर होणारच होणार, परंतु बाजार समितीमध्ये टोमॅटो न पोहोचल्याने टोमॅटोच्या दरात अगदी काही दिवसात अजूनही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के सवलती मध्ये ट्रॅक्टरचलित अवजारांसह इतरही अवजारे, या तारखेपर्यंत लगेच अर्ज करा

Author