राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये महाडीबीटीच्या तत्त्वावर म्हणजेच महाडीबीटीच्या माध्यमातून जवळपास 50% एवढ्या अनुदानावर ट्रॅक्टर चलीत अवजारांसह इतर प्रकारची अवजारे दिली जाणार आहे, ज्या शेतकऱ्यांना अशा 50 टक्के अनुदानावर मिळणाऱ्या अवजारांचा लाभ घ्यायचा असेल, अशांनी लगेच अर्ज करायचा आहे अर्ज प्रक्रिया लवकर करणे गरजेचे असून त्यासोबत काही आवश्यक कागदपत्रे जोडणे सुद्धा आवश्यक असणार आहे.
ट्रॅक्टर चलीत अवजारा कृषी सिंचनासाठी लागणारे अवजारे सुद्धा डीबीटी माध्यमातून दिली जातील तसेच नागरिकांना एक प्रकारचे आवाहन करण्यात आलेली आहे की त्यांनी सहा वर्ष या तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी ज्यांना लाभ घ्यायचा असेल अशांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असून, कृषी विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज भरावा अशा प्रकारचे आवाहन सुद्धा शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे.
ज्यावेळी शेतकऱ्यांची निवड पन्नास टक्के अनुदानास केली जाईल अशावेळी शेतकऱ्यांची निवड झाल्याबरोबर अगदी काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी एका महिन्याच्या आत खुल्या बाजारात मध्ये जाऊन आपल्याला जी पसंत आहे तशा प्रकारची अवजारे खरेदी करावी. शेतकऱ्यांनी अर्ज करत असताना काही आवश्यक कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे त्यामुळे नेमकी कोणती कागदपत्रे जोडावी लागणार आहेत हा प्रश्न नेमका शेतकऱ्यांना पडलेला असेल.
अर्ज प्रक्रिया पूर्ण करत असताना अर्ज सोबत आधार कार्ड, सातबारा, बँक पासबुक, आठ अ, दिव्यांग लाभार्थी असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र, अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमातीतील असेल तर जाता प्रमाणपत्र, अशा प्रकारची कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक असणार आहे. तसेच 50% अनुदानावर अवजारे मिळण्यासाठी जर मोठ्या प्रमाणात अर्ज उपलब्ध झाले तर डीबीटी अंतर्गत एक प्रकारची सोडत यादीनुसार लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे अशा प्रकारे आता लाभार्थ्यांना शेतीसंबंधी अवजारे व ट्रॅक्टर संबंधित अवजारे अत्यंत कमी दरात म्हणजेच 50 टक्के अनुदानावर दिले जाते.
शेतकऱ्यांनो तुमचे सोयाबीन पिवळे पडले का? लगेच हे व्यवस्थापन करा