शेतकऱ्यांनो तुमचे सोयाबीन पिवळे पडले का? लगेच हे व्यवस्थापन करा | Soyabin Vyavasthapan

राज्यातील जवळपास सर्वच भागातील पेरण्या आठपत आलेल्या आहे, तर काही शेतकऱ्यांनी पाऊस आल्याबरोबरच पेरणी केल्याने त्यांचे सोयाबीन चांगल्या प्रमाणात वाढलेले आहे, परंतु सोयाबीन पेरल्यानंतर काही दिवस पावसाचा खंड पडलेला असल्याने अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन हे पिवळे पडलेले आहे, या पिवळ्या पडलेल्या सोयाबीनवर काय उपाय करायचा? हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तसेच पिवळे सोयाबीन पडणे मागचे नेमके कारण काय आहे त्याला व्यवस्थापन कशा प्रकारे करायचे हे शेतकऱ्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे.

 

अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन रोप अवस्थेमध्ये असतानाच पिवळे पडलेले आहे त्याचे कारण म्हणजे अनेक भागांमध्ये पावसाने ढगाळ वातावरण निर्माण झालेली आहे त्यामुळे अन्नद्रव्यांचे शोषण रोपाला चांगल्या प्रकारे करता येत नाहीये, तसेच सोयाबीन पिवळे जास्तीत जास्त चुनखडी युक्त जमिनीमध्ये बघायला मिळते, कारण त्या जमिनीमध्ये लोहाची कमतरता भासत असल्याने सोयाबीन पिवळे पडलेले दिसतात.

 

रोपाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासत असल्याने रोपांच्या शीरांमध्ये पिवळा भाग पसरतो, रोपाची पाने पिवळी पडल्याने हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया ही रोपाची मंदावते, यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांची होऊ शकते कारण प्रकाशात संश्लेषण क्रिया मंदावल्याने वाढ रोपाची खुंटून उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट जाणू शकते.

 

रोप अवस्थेमध्ये असणारे सोयाबीन पिवळे पडले असेल तर त्यावर काही उपाय करणे गरजेचे आहे, जर सोयाबीनला पाण्याची कमतरता भासत असेल तर त्या ठिकाणी तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता करून द्यावी, शेतामध्ये खूप पाणी साचले असेल तर ते पाणी साचलेले काढून टाकण्याची शेतकऱ्यांनी सोय करावी. तसेच सोयाबीनवर फवारणी सुद्धा करणे गरजेचे आहे त्यामध्ये, ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 (II) 50 ग्रॅम, 19:19:19 खत दहा लिटर पाण्यामध्ये प्रति 100 ग्रॅम प्रमाणे मिसळून त्याची सोयाबीनवर फवारणी करावी. अशाप्रकारे वरील प्रमाणे दिलेले व्यवस्थापन केले जाऊ शकते

 

कापसाच्या दरात मोठी वाढ, शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यानंतर कापसाचे दर 8000 पार 

Author