कापसाच्या दरात मोठी वाढ, शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यानंतर कापसाचे दर 8000 पार | Kapus Dar 

राज्यामध्ये खरीप हंगामातील कापसाच्या पेरणीला सुरुवात झालेली आहे परंतु मागील वर्षीचा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या माध्यमातून विक्री केल्या जात आहे, ज्या शेतकऱ्यांकडे कापसाची साठवणूक करून ठेवलेली आहे, म्हणजेच दरवाढीच्या प्रतीक्षेमुळे शेतकऱ्यांकडे कापूस साठवून ठेवलेला असल्याने अशा शेतकऱ्यांना आता आठ हजार रुपयांचा दर मिळणार आहे, कारण राज्यातील एका बाजार समितीमध्ये कापसाला 8 हजार रुपये एवढा दर मिळालेला आहे. परंतु याचा फायदा अत्यंत कमी शेतकऱ्यांना होणार आहे, कारण अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री मोठ्या प्रमाणात केलेली आहे. 

 

यापूर्वी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कापूस दर आठ हजारांवर गेलेले होते, परंतु त्यानंतरही कापसाचे दर उतरले व एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा एकदा कापसाचे दर आठ हजार रुपयांवर गेलेले होते, याच काळामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कापसाची विक्री केलेली होती, व पुन्हा एकदा जून महिन्यात च्या शेवटी कापसाचा दर आठ हजार रुपयांवर पोहोचलेला आहे, परंतु याचा लाभ मात्र व्यापारी व किंचित शेतकऱ्यांना मिळू शकतो.

 

राज्यामधील मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये कापसाला 8050 रुपये एवढा प्रति क्विंटल प्रमाणे दर मिळालेला आहे, व यामुळेच कापसाच्या दरामध्ये चांगल्या प्रकारे तेजी आल्याचे चित्र दिसून येत आहे, शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागलेले आहे, गतवर्षी जरी शेतकऱ्यांना अत्यंत कमी दराने कापसाची विक्री करावी लागली तरी सुद्धा, कापूस मुख्य पीक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केलेली आहे.

 

राज्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात कापसाला कशाप्रकारे दर मिळालेला आहे, यावरून कापसाच्या दराचा अंदाज शेतकरी लावू शकतात त्यामध्ये, 25 जून रोजी 7900 रुपये एवढा दर मिळाला, 26 जून रोजी 7975 रुपये तर 27 जून रोजी चांगला दर म्हणजेच 8050 रुपये एवढा दर कापसाला प्रति क्विंटल प्रमाणे मिळालेला आहे, अशाप्रकारे कापसाच्या दरामध्ये पूर्वीपेक्षा थोडी तेजी आल्याचे दिसत आहे.

 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार दरवर्षी 60 हजार रुपयांची स्कॉलरशिप, लगेच अशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करा