शेतकरी बांधवांनो आता घरी बसूनच करा पिक पेरा ची नोंद, अशी करा पिक पेरा नोंद | Pik Pera Nond Online

Last updated on July 2nd, 2024 at 03:47 pm

दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या शेती बद्दलच्या विविध प्रक्रियेंमध्ये बदल होत चाललेला आहे, व त्यातीलच एक बदल म्हणजे दरवर्षी पिक विमा भरल्यानंतर शेतकऱ्यांना पीक पेऱ्याची नोंद करावी लागते, पूर्वी मात्र पीक पेऱ्याची नोंद करत असताना मोठ्या अडचणीला सामोरे जाऊन पीक पेऱ्याची नोंद शेतकऱ्यांना तहसील कार्यालयामध्ये जाऊन करावी लागत होती, परंतु आता शेतकरी अगदी घरबसल्या आपल्या शेतामधून सुद्धा दोन मिनिटांमध्ये पीक पेऱ्याची नोंद करू शकतात. 

 

शासनाच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे व त्यातीलच एक सुविधा म्हणजेच ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतीतून आपल्या पीक पेऱ्याची नोंद करता येणार आहे, त्यामुळे पीक पेऱ्याची नोंद अँप वरून कशी करावी याबद्दलची माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात व त्यानुसार शेतकरी आपला पीक पेरा नोंदवू शकतात.

 

शेतकऱ्यांना पीक पेऱ्याची नोंद करण्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वर जाऊन त्या ठिकाणी ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करावा, त्यामध्ये भाषा निवडून सर्वप्रथम खातेदाराची म्हणजेच शेतकऱ्यांचे खाते तयार करावे त्यासाठी काही माहिती भरावी, त्यानंतर राज्य, तुमचा जिल्हा, तालुका, गाव अशा प्रकारची संपूर्ण माहिती भरा.

 

मोबाईल क्रमांक, खाते क्रमांक टाका तसेच तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सुद्धा एंटर करून हंगाम निवडा खरीप हंगाम असेल तर खरीप किंवा रब्बी हंगाम असेल तर रब्बी निवडू शकता, त्यामध्ये कोणत्या पिकासाठी किती क्षेत्र आहेत, ही संपूर्ण माहिती भरा. पिकाच्या लागवडीचा दिनांक निवडून सिंचनाची सुविधा निवडा.

ई पिक पाहणी ॲप ची लिंक

त्यानंतर पिकाचा फोटो काढायचा आहे, पिकाचा फोटो काढा व तो अपलोड करा, त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करून तुमची ई पीक पाहणी वरून पीक पेऱ्याची नोंद पूर्ण होईल, अशाप्रकारे शेतकऱ्यांना अगदी सहजरीत्या शेतामध्ये दोन मिनिटात आपल्या पीक पेऱ्याची नोंद करता येणार आहे.

 

मोफत गॅस सिलिंडर नंतर आता मिळणार मोफत सोलर स्टोव्ह , यांना मिळेल लाभ 

Author