मोफत गॅस सिलिंडर नंतर आता मिळणार मोफत सोलर स्टोव्ह , यांना मिळेल लाभ | Mofat Stoh Schene

देशामध्ये विविध प्रकारच्या योजना महिलांसाठी राबविल्या जातात या योजना अंतर्गत महिलांना एक प्रकारची आर्थिक मदत व्हावी तसेच त्यांच्या कामामध्ये त्यांचे स्वास्त राखले जावे हा मुख्य उद्देश राखण्यात आलेला आहे, देशांमध्ये उज्वला गॅस योजना अंतर्गत अनेक महिलांना आतापर्यंत लाभ दिला गेलेला आहे, चुलीच्या धुरापासून महिलांचे संरक्षण व्हावे याकरिता देशांमध्ये उज्वला गॅस योजना राबवली जाते, व या उज्वला गॅस योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडरचे वाटप सुद्धा झालेले आहे. 

 

राज्य शासनाच्या माध्यमातून आता राज्यात सौर चुल्हा योजना राबवली जाणार आहे, या योजनेच्या माध्यमातून महिलांना सौरऊर्जेवर चालणारे स्टोव्ह दिले जाणार आहे, यामुळे महिलांना गॅस सिलेंडरवर केला जाणारा खर्च सुद्धा वाचणार आहे, कारण प्रत्येक महिन्याला किंवा सिलेंडर संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात पैसे देऊन ते भरून आणावे लागते, परंतु सौर चुल्हा योजनेअंतर्गत स्टोव्ह दिल्यानंतर पैशाची सुद्धा एक प्रकारे बचत होणार आहे.

 

महिलांना दिले जाणारे स्टॉव्ह बाजारी किमतीनुसार 15 ते 20 हजार रुपयांचा असेल व महिलांना हे स्टोव्ह शासनाच्या माध्यमातून दिले जाईल, यामध्ये सौर उर्जेवर बॅटरी चार्ज होईल, व त्यावरूनच स्टोव्हवर महिला स्वयंपाक करू शकेल. योजनेच्या माध्यमातून महिलांना अनुदानामध्ये स्वस्त किमतीत हे स्टोव्ह दिले जातील.

 

परंतु उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून देशातील अनेक महिलांना लाभ दिला गेलेला आहे, सौर चुल्हा योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांनी उज्वला गॅस योजनेचा लाभ घेतलेला नाही किंवा लाभ मिळालेला नाही अशांना योजनेच्या माध्यमातून सौर चुल्हा म्हणजेच सौरऊर्जेवर चालणारा स्टोव्ह मिळू शकतो. अशाप्रकारे राज्य शासनाच्या माध्यमातून सौरचुल्हा योजना अंतर्गत सौर उर्जेवर चालणारा स्टोव्ह दिला जाईल.

टीप: सध्या ही योजना सुरू झालेली नाही.

पी एम किसान चे शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा, असे चेक करा, तुम्हाला मिळाले का