या आठवड्यातील कांद्याचा दर एनसीसीएफने केला जाहीर, काय आहे कांद्याचा दर? | Kanda Dar 

या आठवड्यातील कांद्याचे दर नाफेड व एन सी सी एफ ने जाहीर केलेले आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून नाफेड व एनसीसीएफने कांदा खरेदी करणे चालू केलेले असून दर आठवड्यामध्ये कांद्याचे दर जाहीर केले जात असतात, व या आठवड्यातील कांद्याचे दर एनसीसीएफ च्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे, त्यामुळे इतर बाजार समितीमध्ये जाहीर केलेल्या दराच्या किमतीत काय फरक होत आहे बघूयात व एन सी सी एफ ने जाहीर केलेले कांद्याचे दर किती आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 

 

कांद्याला एनसीसीएफ पेक्षा माध्यमातून या आठवड्यातील कांद्याचा दर 2940 रुपये एवढा जाहीर केला आहे. जाहीर करण्यात आलेला दर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकसारखाच लागू असेल, आठवड्यातील जाहीर केलेल्या दरामध्ये तसेच बाजार समितीमध्ये मिळालेल्या कांद्याच्या दरामध्ये चांगल्या प्रमाणात तफावत दीसलेली आहे त्यात, लासलगाव बाजार समितीच्या दरामध्ये 150 रुपयांचा फरक जाणवला व पिंपळगाव बाजार समितीच्या दरात 60 रुपयांचा फरक जाणवलेला आहे.

 

लासलगाव बाजार समितीमध्ये 2751 रुपये एवढा दर मिळाला तर, येवला बाजारात 2600 रुपये एवढा दर कांद्याला मिळालेला होता, पिंपळगाव बसवंत देवळा बाजार समितीमध्ये 3 हजार रुपयांचा दर मिळाला. विंचूर बाजार समितीमध्ये दोन हजार आठशे रुपये एवढा दर कांद्याला मिळाला. 2850 रुपये सिन्नर नायगाव बाजार समितीमध्ये मिळाला.

 

उन्हाळी कांद्याला नाशिक बाजार समितीमध्ये 2700 रुपये रुपये एवढा दर मिळालेला आहे, 3100 रुपये एवढा दर लासलगाव बाजार समितीत कांद्याला मिळाला, 3250 रुपये एवढा दर प्रत्येक क्विंटल कांद्याला पिंपळगाव बाजार समिती येथे मिळाला होता. व पिंपळगाव बाजार समितीतील कांदा दरामध्ये घसरण सुद्धा जाणवलेली होती. अशाप्रकारे नाफेड एनसीसीएफ च्या माध्यमातून आठवड्यातील कांद्याचे दर जाहीर केलेले आहे.

 

आता शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 25 हजार रुपये, या योजनेअंतर्गत मिळवा लाभ 

Author