आता शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 25 हजार रुपये, या योजनेअंतर्गत मिळवा लाभ | Shetkari Yojana

केंद्र शासनाच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्यामध्ये शेतकरी विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक या सर्वांचा समावेश असतो व राज्य शासनाने राबवलेली एक योजना जी शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर अशी आहे, व त्या योजनेच्या माध्यमातून शेतकरी वार्षिक एक लाख 25 हजार रुपये कमवू शकतात ती योजना म्हणजेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, या योजनेअंतर्गत शेतकरी वार्षिक लाखो रुपये कमवू शकतात. 

 

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला शासनाला आपली जमीन भाडेतत्त्वावर द्यावी लागते, जर तुमची जमीन खडकाळ, नापिक अशा प्रकारची जरी असेल तरीसुद्धा तुम्ही शासनाला ही जमीन भाड्याने देऊन एक लाख 25 हजार रुपये वार्षिक कमावू शकता. कारण अशा अनेक जमिनी आहे, की ज्या पडीत आहेत त्यामध्ये उत्पन्न घेतले जाऊ शकत नाही कोणत्याही प्रकारची पीक येऊ शकत नाही, मुरमाळ जमीन आहे खडकाळ जमीन आहे अशी जमीन असेल किंवा कोणत्याही प्रकारची जमीन असेल तर ती जमीन शासनाला भाडेतत्त्वावर देऊन शेतकरी पैसे कमावू शकतो.

 

तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की शासनाला आपली जमीन भाडेतत्त्वावर दिल्यानंतर शासन नेमके आपल्या जमिनीमध्ये काय करणार? तर शासनाच्या माध्यमातून तुमच्या जमिनीमध्ये भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर सौर पॅनल लावले जातील व त्यामधून ऊर्जेची निर्मिती म्हणजेच विजेची निर्मिती करून घेतली जाईल त्यामुळे विज उपलब्ध व्हावी यामुळे सौर कृषी वाहिनी योजना राबवली जात आहे.

 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत अंतर्गत पूर्वी मात्र हेक्टरी 75 हजार रुपये एवढे भाडे दिले जात होते, परंतु आता मात्र या भाड्यामध्ये वाढ करण्यात आलेली असून, 1 लाख 25 हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्याला भाडे दिले जाईल. कमीत कमी 3 एकर एवढी जमीन शेतकऱ्याला भाडेतत्त्वावर ठेवावी लागेल. व मुख्य बाब म्हणजे दरवर्षी तीन टक्के एवढी वाढ भाड्यामध्ये होणार आहे. अशाप्रकारे ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.