ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार दरवर्षी 60 हजार रुपयांची स्कॉलरशिप, लगेच अशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करा | Scholarship Scheme

तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे, त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे, व लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल, तसेच योजनेच्या माध्यमातून दरवर्षी साठ हजार रुपये एवढी स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे, अशाप्रकारे योजनेच्या माध्यमातून लाभ कसा घ्यायचा कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा अर्ज प्रक्रिया कशी पूर्ण करायची? या प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया त्याबरोबरच पात्रता काय व निकष काय आहेत हे सुद्धा जाणण्याचा प्रयत्न करूयात. 

 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अंतर्गत ओबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दरवर्षी विविध हप्त्यांमध्ये एकूण साठ हजार रुपयांची स्कॉलरशिप दिली जाणार आहे. अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच वरील प्रमाणे देण्यात आलेल्या कॅटेगिरी मधील त्यांचे कास्ट सर्टिफिकेट असावे. बँकेचे पासबुक व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असू नये. विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे, असे ठिकाण शहर किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असावे. योजनेच्या माध्यमातून बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या उच्च शिक्षणासाठी ही योजना लागू आहे.

 

विद्यार्थी बारावीनंतर घेणाऱ्या शिक्षणामध्ये जास्तीत जास्त पाच वर्ष योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ शकतात, प्रवेशानंतर 75 टक्के उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र असावे, योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील सहाशे विद्यार्थी निवडले जातील तसेच विद्यार्थी यांचे वय 30 वर्षापेक्षा जास्त असू नये.अर्जामध्ये जोडावयाची आवश्यक कागदपत्रे स्थानिक रहिवासी नसल्याचे व भाड्याने राहत असल्याचे स्वयंघोषणापत्र जोडावे, शासकीय हॉस्टेलमध्ये प्रवेशित असाल तर योजनेस लाभ घेता येणार नाही. तसेच योजनेच्या माध्यमातून एकाच वेळेला पैसे मिळत नसून प्रत्येक वेगवेगळ्या हप्त्यानुसार पैसे दिले जातील.

 

विद्यार्थी मुंबई शहर मुंबई उपनगरच्या मोठ्या शहराच्या ठिकाणी शिक्षण घेत असेल तर एकूण रक्कम 60 हजार रुपये, एवढी स्कॉलरशिप मिळेल, महानगरपालिका नगरपालिका या एरियामध्ये जर शिक्षण चालू असेल तर 59 हजार रुपये एवढी रक्कम मिळेल. इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी शिक्षण घेत असल्यास वार्षिक 43 हजार रुपये मिळेल व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असल्यास 38 हजार रुपये एवढी वार्षिक स्कॉलरशिप दिली जाईल.

 

अर्जाचा नमुना 

 

अर्ज प्रक्रिया कशी पूर्ण करावी? 

 

अर्जाची सर्वप्रथम प्रिंट काढावी त्यामध्ये सर्वप्रथम फोटो चिपकवा, विचारली गेलेली संपूर्ण माहिती विविध प्रकारची असेल ती माहिती योग्य सुट्टीत अक्षरांमध्ये भरून त्यासोबत आवश्यक काही कागदपत्रे जोडून विद्यार्थ्याने अर्ज 15 जुलै च्या आत जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले इतर मागास बहुजन कल्याण मंडळ या ठिकाणी जाऊन हा अर्ज करायचा आहे, अशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया विद्यार्थ्यांनी केल्यानंतर त्यातून प्रत्येक जिल्ह्यातील सहाशे विद्यार्थ्यांची निवड ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून केली जाईल.

 

पीक पेरा प्रमाणपत्र 2024, पिक विमा भरण्यासाठी आवश्यक, पिक पेरा स्वघोषणा पत्र मिळवा मोबाईल वर

Author