पीक पेरा प्रमाणपत्र 2024, पिक विमा भरण्यासाठी आवश्यक, पिक पेरा स्वघोषणा पत्र मिळवा मोबाईल वर | Pik Pera Self Declaration For Pik Vima

देशामध्ये पीक विमा योजना राबवले जाते, देशामधील मोठ्या प्रमाणात शेतकरी पिक विमा योजनेच्या माध्यमातून लाभ नोंदवतात तसेच ही योजना खरीप हंगाम यासह इतरही हंगामामध्ये राबवली जाते यावर्षी खरीप हंगामाला सुरुवात झालेली असल्याने खरीप हंगामातील पीक विमा भरणे चालू झालेले आहे, खरीप हंगामातील पिक विमा शेतकऱ्यांना 15 जुलैपर्यंत भरता येणार आहे. पिक विमा योजनेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने शेतकरी लाभ घेत आहे कारण पिक विमा योजनेमुळे एक प्रकारचे संरक्षण शेती पिकाला मिळते.

 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात एक रुपयात पिक विमा योजना चालू करण्यात आलेली असून राज्यातील शेतकऱ्यांना एका पिकासाठी फक्त एकच रुपये भरून पिक विमा योजनेत सहभाग नोंदवता येतो, पिक विमा भरत असताना काही आवश्यक कागदपत्रांची गरज असते त्यामधीलच एक कागदपत्रे म्हणजे एक पेरा प्रमाणपत्र होय. महाराष्ट्रामधील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे, अजूनही काही शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित आहे, अशा लवकरात लवकर पिक विमा भरावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदवावा अशा प्रकारचे आवाहन केले जात आहे.

 

पिक विमा चा अर्ज भरत असताना शेतकऱ्यांकडे काही आवश्यक कागदपत्रे हवी असतात, काही संबंधित आवश्यक कागदपत्रे असेल तरच विमा भरता येतो त्यामध्ये, शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक खाते पुस्तक, मोबाईल क्रमांक, सातबारा उतारा त्यासोबतच पीक पेरा प्रमाणपत्र हवे असते, खालील प्रमाणे एक पेरा प्रमाणपत्र पीडीएफ देण्यात आलेला आहे, त्यावरून शेतकरी पिक पेरा प्रमाण पत्र मिळवू शकतात.

 

पिक पेरा प्रमाणपत्र