शिंदे सरकार देणार महिलांना मोठं गिफ्ट, लवकरच लागू करणार ही योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती | Schemes For Women

महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात व अजूनही एक योजना जी महिलांसाठी राबवण्याची इच्छा महाराष्ट्र शासना अंतर्गत व्यक्त करण्यात आलेली आहे, ती योजना म्हणजेच मध्य प्रदेश मध्ये राबवली जात असलेली लाडली बहना योजना, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब महिलांना लाभ देऊन त्यांच्या खात्यावर पैशाचे वितरण केले जाते, अशाच प्रकारची योजना महाराष्ट्र शासना अंतर्गत राबवली जाण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावर सुद्धा उलट यापेक्षा जास्त रक्कम जमा दिली जाईल. 

 

आता अगदी येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणूक होईल व विधानसभेच्या निवडणुकी आधीच महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून लाडली बहना योजनेसारखी योजना म्हणजेच महिलांच्या खात्यावर पैसे वितरित केले जाईल व यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शासनाला चांगला फायदा होऊ शकतो. तसेच योजना राबविल्यानंतर महाराष्ट्रातील दीड कोटीहून अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळणार असल्याची सांगितली जात आहे.

 

मध्यप्रदेशांमधील लाडली बहना योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर 1250 रुपये जमा केले जातात, व महाराष्ट्र शासन या रकमेपेक्षाही जास्त रक्कम महिलांच्या खात्यावर देण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती देत आहे, मध्यप्रदेश मध्ये या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 21 ते 60 वर्ष दरम्यानचे असणे महत्त्वाचे आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवल्या जाण्याचा विचार चालू असून लाडली बहना योजने अंतर्गत असलेल्या अटी महाराष्ट्रातील योजनेअंतर्गत सुद्धा लागू पडतील, व पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल. अशाप्रकारे गरीब महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

 

या रेशन कार्ड धारकांना मोठी खुशखबर, मिळेल हा लाभ, त्यासाठी करा हे काम 

Author