टोमॅटो च्या किमतीत प्रचंड वाढ, किमती गगनाला भिडल्या, जाणून घ्या दर | Tomato Rate Increase

राज्यामध्ये मान्सून दाखल झालेला आहे, तर मानसून पूर्व पावसामुळे भाजीपाला दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, कारण मान्सूनपूर्व पावसामुळे भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले आहे, मागील काही दिवसांमध्ये कांद्याच्या दराने सर्व सामान्यांना रडविले होते, व आता मात्र टोमॅटोचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. एवढेच नव्हे तर सर्व भाजीपाल्याच्या दराच्या किमती सुद्धा वाढताना दिसतात. 

 

टोमॅटोच्या दरात वाढ होण्याचे कारण म्हणजे मान्सूनपूर्व पावसाने टोमॅटोचे नुकसान झाले, तसेच त्यानंतर तपलेल्या कड्क उणीमुळे टोमॅटो खराब झाल्याने टोमॅटोचे उत्पादन सुद्धा घडले व ग्राहकांच्या माध्यमातून टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी होत चाललेली आहे, परंतु टोमॅटोचे उत्पादन कमी असल्यामुळे टोमॅटोच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

 

किरकोळ बाजारामध्ये टोमॅटोचे दर 80 ते 100 रुपये किलोवर जाऊन पोहोचलेले आहे, तर घाऊक बाजारामध्ये 40 ते 50 रुपये किलोने टोमॅटोची विक्री केली जात आहे, अशाप्रकारे कांद्यानंतर आता टोमॅटो दराने सुद्धा मोठी उंच उडी मारून मोठा दर मिळवला आहे. सर्वसामान्य गरीब नागरिकांना मात्र टोमॅटो खरेदी करणे आता शक्य होणार नाही, त्यामुळे शक्यतो टोमॅटोचा उपयोग कमी करणे सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरेल.

 

टोमॅटोच्या दरामध्ये वाढ झाल्याने एक प्रकारे शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळणार आहे कारण एरवी मात्र शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल होत असतो, परंतु आता टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो उपलब्ध आहे, म्हणजेच टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा यात चांगला फायदा होणार आहे.

 

या घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ, 2 लाख 50 हजार अनुदान, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया 

Author