बाजारातील सोयाबीनची आवक वाढली, परंतु सोयाबीनचे दर कधी वाढणार? | Soyabin Dar

Last updated on July 21st, 2024 at 01:24 pm

मागील वर्षी मोठ्या संख्येने राज्यात सोयाबीन पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केलेली होती, तसेच चांगल्या प्रमाणात उत्पादन सुद्धा सोयाबीनचे झालेले होते, परंतु गेल्यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनला मिळालेला दर अत्यंत कमी होतात त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता सोयाबीन साठवणूक करून ठेवलेली आहे, कारण खूप कमी दरांमध्ये सोयाबीन विक्री करून शेतकऱ्यांना मोठा तोटा होऊ शकणार होता, त्यामुळे अनेक शेतकरी असे आहेत की त्यांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवलेली आहे, व आता सध्याच्या स्थितीमध्ये बाजारातील सोयाबीनची आवक वाढताना दिसत आहे.

 

यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झालेली असून अनेक शेतकऱ्यांच्या प्रेरणा पूर्ण झालेल्या आहे व ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या व्हायच्या असतील याचे मुख्य कारण म्हणजे पावसाचा अभाव अनेक भागांमध्ये पाऊस अजून पर्यंत चांगल्या प्रकारे पडलेला नाही, त्यामुळे अनेकांच्या पेरण्या अडकून बसलेल्या आहेत, परंतु जास्तीत जास्त भागातील पेरण्या पूर्ण झालेल्या आहे. व पेरण्यासाठी मोठ्या संख्येने पैशाची आवश्यकता शेतकऱ्यांना असते त्यामुळे ना इलाजाने अनेक शेतकरी बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्री करत आहे त्यामुळे बाजारातील सोयाबीनची आवक वाढलेली आहे.

 

जेव्हा चांगला दर सोयाबीनचा वाढणार तेव्हाच सोयाबीनची व्यक्ती करणार असे शेतकऱ्यांनी ठरवलेले असले तरी सुद्धा पाच हजाराच्या आतच असलेल्या दराने शेतकऱ्याला सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. 4800 ते 5000 रुपये एवढा दर सोयाबीनला मिळत आहे. पैशाची आवश्यकता असल्याने सोयाबीनची विक्री करत आहे परंतु सोयाबीनचा दर कधी वाढणार या चिंतेत अजूनही शेतकरी दिसतात. एवढेच नव्हे तर तीन वर्षे किंवा दोन वर्ष आधीचे सुद्धा सोयाबीन शेतकऱ्यांनी साठवून ठेवले आहे त्यामुळे अशे शेतकरी सोयाबीनची विक्री करत असल्यामुळे बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली आहे, परंतु दर चांगल्या प्रमाणात वाढला पाहिजे कारण त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल व केलेला खर्च सुद्धा निघून येईल.

 

शिलाई मशीन योजनेचा अर्ज चालू, या तारखेपर्यंत लगेच अर्ज करा, मिळणार अनुदानावर शिलाई मशीन 

Author