शिलाई मशीन योजनेचा अर्ज चालू, या तारखेपर्यंत लगेच अर्ज करा, मिळणार अनुदानावर शिलाई मशीन | Shilae Mashin Yojana 

Last updated on July 21st, 2024 at 01:29 pm

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवर्षी जिल्हा परिषद योजनांच्या माध्यमातून शिलाई मशीनचे अनुदान दिले जाते, त्यामध्ये शिलाई मशीन योजनेचा अर्ज अनेक जण करतात परंतु यावर्षी मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून लाडकी बहिण योजना चालू करण्यात आलेली असल्याने शिलाई मशीन योजनेच्या अर्जाकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष नागरिकांचे राहिलेले नाही, त्यामुळे शिलाई मशीन हवी असेल अशांना शिलाई मशीन अनुदान योजनेचा अर्ज करता येणार आहे. 

 

विविध जिल्ह्यांमध्ये बेरोजगार नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे जिल्हा परिषद योजनांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदान नागरिकांना दिले जाते, त्यावर अशाच प्रकारे अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल व शिलाई मशीन योजनेअंतर्गत आपला स्वतःचा व्यवसाय सुद्धा चालू करता येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असणार आहे.

 

विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या कालावधीमध्ये योजनेसाठी अर्ज मागविले जात असतात, व आता मात्र छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये शिलाई मशीन अनुदान योजनेसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे, योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नव बौद्ध प्रवर्ग अशा प्रवर्गातील असणाऱ्यांना अर्ज करता येईल.

 

अर्ज PDF

 

योजनेचा अर्ज करताना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र, खाते पुस्तक, रहीवासी दाखला, शिवणकाम करत असल्याचा दाखला कसा प्रकारची आवश्यक कागदपत्रे अर्ज करताना लागणार आहे, अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून घ्यावी त्यानंतर तो भरून संबंधित विभागांमध्ये आवश्यक कागदपत्रे जोडून 15 जुलै पर्यंत जमा करा. अशाप्रकारे शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे.

 

शासन निर्णय जारी, मुलींना मिळणार मोफत शिक्षण, मुलींचे परीक्षा शुल्क व शिक्षण शुल्क शासन भरणार 

Author