या घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ, 2 लाख 50 हजार अनुदान, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया | Shabari Gharkul Yojana 2024

देशामध्ये विविध प्रकारच्या घरकुलाच्या योजना गरीब सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या राबविल्या जातात, त्यातीलच एक योजना म्हणजेच शबरी घरकुल आवास योजना होय, या योजनेच्या माध्यमातून, पूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जायचा, परंतु आता शहरी भागातील नागरिकांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ या योजनेच्या माध्यमातून दिला जातो, व शहरी भागासाठी अडीच लाख रुपये एवढे अनुदान योजनेच्या माध्यमातून दिली जाते, व यासंबंधीची अर्ज चालू झालेले असून ज्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

 

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी शबरी घरकुल आवास योजना राबवली जाते, या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षापेक्षा जास्त रहिवास असलेले नागरिक योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ शकणार आहेत तसेच लाभ घेऊ इच्छिणाऱ्या किंवा पात्र ठरणाऱ्या नागरिकाचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावी. अनुसूचित जमातीतील नागरी योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.

 

शबरी घरकुल आवास योजनेतील महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थ्याचे पक्के घर नसावे तसेच शहरी भागातील जे नागरिक आहे, त्यांची वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त असू नये, तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेले नागरिक अर्ज करू शकणार नाही. अशाप्रकारे काही अटी देण्यात आलेल्या आहे, व योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

 

अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज घ्यावा त्यानंतर त्या अर्जामध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी, तसेच उत्पन्नाचा दाखला अशा प्रकारची काही आवश्यक असणारी कागदपत्रे त्यासोबत जोडणे आवश्यक असेल विविध नमुन्यातील अर्जासोबत ही कागदपत्रे जोडून अर्ज तुमच्या भागातील आदिवासी विकास एकात्मिक प्रकल्प या कार्यालयामध्ये अर्ज सादर करावा लागणार आहे.

 

अर्ज नमुना 

Author