उपमुख्यमंत्र्यांनी केली शेतकऱ्यांसाठीची मोठी घोषणा, राज्यात मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवणार | Magel Tyala Saur Pamp

राज्यातील अर्थसंकल्पाला सुरुवात झालेली असून अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला व त्यामध्ये अनेक प्रकारच्या घोषणा महिलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत करण्यात आलेल्या आहे, त्यातीलच शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली असून राज्यांमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत लाभ दिला जाणार आहे, ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक असून मोठ्या प्रमाणात विजेची बचत या योजनेमुळे होऊ शकणार आहे. 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप दिले जाईल त्याबरोबरच या योजनेमुळे शेतकऱ्यांची वीज बिलाची बचत होणार आहे, त्यामुळे शेतीमध्ये दिवसा पाण्याची उपलब्धता अगदी मुबिलक प्रमाणात शेतकऱ्यांना होईल, शेतकऱ्यांना विजेवर अवलंबून सुद्धा राहाव लागणार नाही, व शेतीला अगदी वेळेवर पाणी मिळू शकेल. याबरोबरच मोठी दुसरी घोषणा केलेली असून त्यामध्ये आतापर्यंत थकीत असलेले शेतकऱ्यांचे वीज बिल सुद्धा माफ करण्यात आलेले आहे.

 

शेतकऱ्यांना प्रति एकर 5000 रुपये एवढी मदत सुद्धा दिली जाईल ही घोषणा केलेली असून महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली जाणार आहे, अशा प्रकारच्या विविध घोषणा अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहे, त्यातील मुख्य बाब म्हणजे शेतकऱ्यांना आता मागेल त्याला सौर कृषी पंप दिला जाईल. राज्यातील 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप दिले जाईल, शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा व्हावा याकरिता 15000 कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. अशाप्रकारे अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठीची ही मोठी घोषणा अत्यंत शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.

 

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, तब्बल एक लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार

Author