कापसावर येतोय लाल्या रोग , शेतकऱ्यांनो लगेच नियंत्रण करा अथवा, उत्पादनात होणार मोठी घट | Kapus Lalya Rog 

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात, परंतु कापूस असे पीक आहे की, ज्यावर मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा होतो, व विविध प्रकारचे रोग कापसावर उद्भवतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाच्या उत्पादनात सुद्धा घट होण्याची शक्यता असते, अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी रोगावर नियंत्रण वेळेवर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. विविध भागांमध्ये कापसावर मर रोग तसेच लाल्या रोग आढळलेला आहे, या लाल्या रोगामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान होत आहे, कारण लाल्या रोगामुळे उत्पादनात मोठी घट सुद्धा होऊ शकते, कारण पानातील संपूर्ण रस किडी शोषून घेतात त्यामुळे या रोगावर नियंत्रण शेतकऱ्यांनी वेळेवर मिळवणे आवश्यक आहे. 

 

लाल्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी मुरमाड किंवा एकदम हलक्या जमिनीमध्ये कापसाची लागवड करणे हे एक कारण आहे, त्यामुळे अशा जमिनीत कापसाची लागवड करणे टाळावे, तसेच ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पान्याची साठवणूक होते जमिनीतून पाण्याचा निचरा होत नाही, अशा ठिकाणी पाण्याचा निसरा करावा म्हणजेच पाणी शेतीतून काढून टाकावे, तसेच अनेकदा जमिनीमध्ये एकच एक पीक लावणी म्हणजेच यामुळे सुद्धा अनेक प्रकारचे रोग उद्भवतात.

 

शेतीमध्ये लाल्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर लवकरात लवकर शेतकऱ्यांनी त्या कपाशीच्या झाडांना खत तसेच मॅग्नेशियमची कमतरता भरण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट ची फवारणी करावी, 19-19-19 हे पाच ग्रॅम व नॅनो युरिया चार ग्रॅम यांची फवारणी करावी, अशाप्रकारे लाल्या रोगावर व्यवस्थापन मिळवता येऊ शकते. शेतकऱ्यांनी जेव्हा कापूस पाते अवस्थेत किंवा बोंड अवस्थेमध्ये येतो अशावेळी डीएपी किंवा युरियाची फवारणी करावी.

 

मर रोग सुद्धा जाणवत आहे त्यामुळे या मर रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी, दीड किलो पोटॅश त्यासह दीड किलो युरियाची फवारणी करणे आवश्यक असेल, फवारणी केल्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये डीएपी चे द्रावण करून झाडाजवळ द्यावे अशा प्रकारचे व्यवस्थापन शेतकऱ्यांनी केले तर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.

 

शासन देणार शेतकऱ्यांना 50 हजार रुपये, लगेच अर्ज करा

Author