नाफेड व एनसीसीएफ च्या माध्यमातून आठवड्यातील कांद्याचे दर जाहीर, कुठे मिळाला कांद्याला सर्वाधिक दर? | Kanda Dar 

प्रत्येक आठवड्यामध्ये नाफेड व एनसीसीएफ च्या माध्यमातून कांदा दर जाहीर केले जातात, या आठवड्यातील कांद्याचे दर नाफेड व एनसीसीएफ च्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले असून, बाजार समितीमध्ये मिळालेला कांद्याला दर जास्त आहे, की मग नाफेडच्या माध्यमातून कांद्याला जास्त दर मिळतो, हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा नाफेड व एन सी सी एफ च्या माध्यमातून दर जाहीर केलेले होते, परंतु नाफेड कडून जाहीर केलेल्या दरापेक्षा इतर बाजार समितीमध्ये असलेला दर कांद्याला जास्त बघायला मिळालेला आहे. 

 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक जुलै 2024 ला नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून कांद्याचे दर जाहीर केलेले असून हे कांद्याचे दर सर्वच जिल्ह्यांमध्ये लागू असणार आहे, व हे दर शनिवार पर्यंत लागू राहते व त्यानंतर पुन्हा एकदा आठवड्याच्या सुरुवातीला प्रत्येक आठवड्यामध्ये दर जाहीर केले जाईल. जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार 2880 रुपये एवढा कांद्याला दर नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून जाहीर केला गेला आहे.

 

नाफेडच्या माध्यमातून जाहीर केलेल्या दरापेक्षा लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेला दर तीन हजार दोनशे रुपये एवढा होता व हा दर गेल्या आठवड्यामध्ये मिळालेल्या कांद्यापेक्षा जास्त बघायला मिळाला, देवळा बाजार समितीमध्ये सुद्धा कांद्याला 3205 रुपये एवढा दर मिळालेला आहे, वैजापूर या ठिकाणी 3100 रुपये एवढा दर कांद्याला मिळालेला आहे.

 

कळवण बाजार समिती 3255 रुपये एवढा कांद्याला दर मिळालेला होता, चांदवड बाजार समितीमध्ये 3001 रुपये असा दर कांद्याला आहे, तीन हजार दोनशे रुपये असा दर कांद्याला नागपूर या ठिकाणी मिळाला, एकंदरीत विचार करायचा झाल्यास नाफेड व एनसीसीएफ च्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या दरापेक्षा बाजार समित्यांमध्ये म्हणजेच काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला जास्त दर मिळताना दिसतो.

 

अरे बापरे, जिओ च्या रिचार्ज आता 25 टक्के ने महागले! आता एक महिन्याचं रिचार्ज साठी मोजा येवढे रुपये

Author