चांदीचे दर पोहोचणार 1.25 लाख रुपयांवर, काय मिळतोय सध्या चांदीला दर, बघा संपूर्ण माहिती | Chandi Dar 

दिवसेंदिवस चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्याबरोबर सोन्याचे दर वाढताना दिसतात व सध्याच्या स्थितीमध्ये व मागील काही दिवसांमध्ये लग्न सराईचा काळ होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या माध्यमातून सोने चांदीची खरेदी केली गेली व यामुळे सोने चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे, ब्रोकरेज हाऊसच्या अहवालानुसार चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ पुढील काही काळात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांनी चांदीची खरेदी करावी की नाही हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला दिसतो. 

 

ब्रोकरेज हाऊस ने दिलेल्या अहवालानुसार चांदीच्या दरामध्ये गेल्या काही महिन्यात झालेली आहे 86,000 – 86500 रुपये एवढी प्रमुख आधार पातळी चांगली दराची आहे, तसेच सध्याच्या स्थितीमध्ये असे असणारे चांदीचे दर येणाऱ्या काही दिवसातच एक लाख रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे, कारण दिवसेंदिवस चांदी व सोन्याच्या किमती वाढत आहे, तसेच ग्राहकांची मागणी सुद्धा वाढत चाललेली आहे, कारण अनेक जण चांदी खरेदी करून त्यामध्ये गुंतवणूक करतात व ही गुंतवणूक पुढे जाऊन त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

 

चांदीच्या दरामध्ये जर थोड्या प्रमाणात घट झाली तर ग्राहकांनी मात्र चांदी खरेदी करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे, त्यामुळे जर थोड्या प्रमाणात घट झाली असता चांदीची खरेदी करावी अशा प्रकारचा सल्ला सुद्धा ब्रोकरेज हाऊस ने दिलेला आहे, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठीची या स्थितीची अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे चांदीच्या दरांमध्ये पुढे मोठ्या प्रमाणात वाढ होऊन 1.25 लाख रुपये पर्यंत चांदीचे दर जाऊ शकतात.

 

रेशन कार्ड धारकांना मिळणार या सणानिमित्त आनंदाचा शिधा, मिळणार एवढ्या वस्तू 

Author