राज्यांमध्ये लाडका भाऊ योजना राबवण्यास मंजुरी, तरुणांना मिळणार दर महिन्याला 10 हजार रुपये | Ladaka Bhau Yojana 

Last updated on July 21st, 2024 at 01:03 pm

राज्यामध्ये लाडका भाऊ योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे, व त्या संबंधित जीआर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, माझा लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला तरुणांना दहा हजार रुपये मिळणार आहे, परंतु ही योजना कोणत्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या नागरिकांसाठी असणार आहे हे सुद्धा जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे, कारण अनेक उमेदवार बारावी पास असतात तर काही पदवी, पदव्युत्तर शिक्षण सुद्धा घेत असतात, परंतु एवढे शिक्षण घेऊन सुद्धा तरुण हे बेरोजगार असतात, त्यामुळे त्यांना एक प्रकारे रोजगार प्राप्त व्हावा त्यामुळे राज्यात रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम व यालाच एक चांगले नाव देऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नाव देऊन या योजनेत सुरुवात करण्यात आलेली आहे. 

 

शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दर महिन्याला त्यांचे शिक्षण विचारात घेऊन विद्या वेतन दिले जाईल,या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेले आहे, ज्यांना रोजगार प्राप्त करायचा असेल अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहा महिने रोजगार प्रशिक्षण देऊन शैक्षणिक क्षमतेनुसार विद्यावेतन दिले जाईल, त्यानंतर प्रमाणपत्र सुद्धा त्यासोबत दिले जाणार आहे.

 

बारावी पास विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये एवढे विद्यावेतन दिले जाणार असून, पदविका घेतलेले त्यासह आयटीआय चे विद्यार्थी यांना प्रत्येक महिन्याला 8 हजार रुपये एवढे विद्यावेतन दिले जाईल, पदवीधर पदवीधर अशा विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये एवढे विद्यावेतन दर महिन्याला दिले जाणार आहे, परंतु जे तरुण रोजगार आहे रोजगार हवा आहे अशांना अर्ज करावा लागणार आहे. तसेच विद्या वेतनाव्यतिरिक्त जो काही पगार दिला जाईल तो सुद्धा वेगळा असणार आहे.

 

या योजनेअंतर्गत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे परंतु शैक्षणिक मर्यादा ही निदान बारावी पास असणे गरजेचे आहे, तसेच वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास 18 ते 35 वर्षे एवढी वयोमर्यादा योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहे, उमेदवाराकडे आधार कार्ड असावे ,त्यासह बँक पासबुक असावे व मुख्य बाब म्हणजे लाभार्थी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अशा प्रकारच्या काही अटी व शर्ती सुद्धा आहे त्यामुळे अशा प्रकारची ही लाडका भाऊ योजना राज्यात राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

 

शासन निर्णय जारी, मुलींना मिळणार मोफत शिक्षण, मुलींचे परीक्षा शुल्क व शिक्षण शुल्क शासन भरणार 

Author