तुमच्या गावातील मतदार यादी जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल, तर हे दोन मिनिटांमध्ये शक्य होणार आहे, कारण तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला तुमच्या गावातील मतदार यादी डाऊनलोड करता येणार आहे. व याची संपूर्ण प्रोसेस आपण बघणार आहोत. त्यासोबत तुम्ही जर नवीनच मतदान कार्ड काढलेले असेल, तुम्हाला नवीन मतदान यादी मध्ये तुमचे नाव आले की नाही हे चेक करण्यासाठी संपूर्ण प्रोसेस फॉलो करून तुमच्या गावातील मतदार यादी डाऊनलोड करू शकता.
निवडणूक असेल तर मतदार यादी महत्वाची असत, तुमच्या गावातील मतदार यादी मध्ये तुमचे नाव आहे की नाही त्याप्रमाणे कोणाकोणाचे नाव आहे हे जर तुम्हाला चेक करायचे असेल,तर ते तुमच्याच मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये शक्य होणार आहे. तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मतदान यादी डाउनलोड करता येणार आहे.
मतदार यादी डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रोसेस
- मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://ceoelection.maharashtra.gov.in/searchlist/या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा विचारले जाईल त्यानंतर तुम्ही नंतर जिल्हा निवडा.
- जिल्हा निवडल्यानंतर तुमचा मतदार संघ निवडायचा आहे
- त्यानंतर तुम्ही तुमची भाषा निवडा
- नंतर तुमच्या गावातील पार्ट म्हणजे भागाची निवड तुम्हाला करायची आहे, प्रत्येक भागाची PDF तुम्ही वेगवेगळे डाऊनलोड करू शकणार आहात.
- पार्ट सिलेक्ट केल्यानंतर गावाचे नाव टाका. त्यानंतर तुम्हाला तिथे एक कॅपच्या कोड दिसेल असेल,तो कोड दिलेल्या बॉक्स मध्ये टाका.
- Open PDF वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या पार्ट ला व गावाला निवडले तेथील मतदार यादी तुमच्या समोर ओपन होईल.
- अशाप्रकारे तुम्ही दोन मिनिटांमध्ये तुमच्या गावातील मतदार यादी डाऊनलोड करू शकता.