वसई विकास सहकारी बँकेच्या वतीने पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. वसई बँकेच्या वतीने विविध पदांकरिता भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांनी विविध पदांकरिता ईमेल द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. या भरतीची जाहिरात प्रकाशित झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत सदर उमेदवारांना अर्ज सादर करायचे आहे.
Vasai Vikas Co Operative Bank यांनी Vasai Vikas Bank Bharti ची अधिकृत जाहिरात प्रकाशित केलेली आहे. Vasai Vikas Cooperative Bank is conducting new recruitment. Under this recruitment, applications are being invited for various posts online through email within ten days from the date of publication of advertisement. Information about Vasai Development Bank Recruitment terms and conditions as well as eligibility and application process is given below.
वसई विकास बँक भरती Vasai Bank Recruitment :
एकूण रिक्त जागा: 09
पदांचे नाव:
1. Chief executive officer
2. Assistant general manager
3. Senior manager
वयोमर्यादा: कमीत कमी 35 जास्तीत जास्त 65 वर्षे(बँकेच्या नियमानुसार वयामध्ये सूट देण्याचा अधिकार बँकेकडे आहे)
अर्ज प्रक्रिया: आँनलाईन ( ईमेल द्वारे)
अर्ज करण्याची अंतिम तारीख: जाहिरात प्रकाशित झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत.
शैक्षणिक पात्रता :
1. CA किंवा तत्सम विषयात पदव्युत्तर
2. CAIIB/DBF/डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट किंवा समकक्ष
3. पदवीधर
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 1744 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरू
पदाचे नाव | एकूण जागा |
1. Chief executive officer | 01 |
2. Assistant general manager | 02 |
3. Senior manager | 06 |
पदाचे नाव | अनुभव |
Chief executive officer | बँकिंग क्षेत्राचा 15 वर्षाचा अनुभव, कमीत कमी आठ वर्षे बँकेतील मध्यम किंवा सीनियर स्तरावर काम करण्याचा अनुभव. |
Assistant general manager | i. बँकिंग क्षेत्राचा 15 वर्षाचा अनुभव, कमीत कमी आठ वर्षे बँकेतील मध्यम किंवा सीनियर स्तरावर काम करण्याचा अनुभव. ii. Npa recovery, audit& taxation, तसेच General Banking Operations यांचा अनुभव |
Senior manager | i. बँकिंग क्षेत्रातील लहान आणि मोठ्या शाखा हाताळण्याचा कमीत कमी सात वर्षाचा अनुभव ii. Npa recovery, audit& taxation, तसेच General Banking Operations यांचा अनुभव |
वसई विकास बँक भरती अर्ज प्रक्रिया Vasai Vikas Bank Recruitment Application Process :
वसई विकास सहकारी बँकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या Vasai Vikas Bank Bharti प्रक्रिया अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांना बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ई-मेल अड्रेस वर आपला अर्ज सादर करायचा आहे. उमेदवारांना ईमेल पद्धतीने अर्ज करायचा असून जाहिरात प्रकाशित झाल्याच्या दहा दिवसाच्या आत अर्ज करता येणार आहे. अर्जासोबत उमेदवारांना त्यांच्या सर्व शैक्षणिक तसेच इतर कागदपत्रे जोडावे लागतील.
Email – hrd@vasaivikasbank.co.in
वरील ईमेल पत्त्यावर उमेदवारांना अर्ज सादर करायचे आहे.
पंजाब नॅशनल बँक विविध पदांकरिता भरती सुरू
वसई विकास बँक भरती अंतर्गत आवश्यक पात्रता Eligibility Required for Vasai CO operative Bank Recruitment
वसई विकास सहकारी बँकेच्या वतीने उमेदवारांची निवड करण्याकरिता खालील प्रमाणे पात्रता ठरवून देण्यात आलेली आहे.
1. उमेदवाराला सहकारी बँकिंग क्षेत्रातील अनुभव असावा.
2. उमेदवारास मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये संभाषण करता यावे. या भाषांचे उमेदवाराला पुरेपूर ज्ञान असावे
3. उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.
4. उमेदवारांनी या भरती अंतर्गत अर्ज भरताना दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची निवड करण्यात येणार आहे. जर बँकेची निवड समिती उमेदवारांच्या माहितीवर संतुष्ट नसेल तर त्यांची निवड होणार नसून अपुरी माहिती असल्यास त्यांची निवड होणार नाही.
5. बँक उमेदवारांची शैक्षणिक तसेच सर्व पात्रता बघून निवड करेल.
Vasai Vikas Bank Bharti अंतर्गत उमेदवारांकरिता सूचना:
1. या भरती अंतर्गत उमेदवारांना ईमेलच्या माध्यमातून अर्ज करायचा असल्यामुळे भरतीची जाहिरात प्रकाशित झाल्याच्या दहा दिवसांच्या आत अधिकृत ई-मेल पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती देऊ नये तसे आढळल्यास त्यांची निवड करण्यात येणार नाही.
3. या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड करण्याचे अधिकार बँकेच्या संचालक मंडळाकडे असेल.
4. ज्या उमेदवारांकडे मराठी, इंग्रजी व हिंदी या भाषेचे ज्ञान असेल त्यांचीच निवड करण्यात येईल.
Official Notification | Download now |
अर्ज करा | hrd@vasaivikasbank.co.in |
वसई विकास बँक भरती महाराष्ट्र संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारचे नोकरी विषयक व भरती विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.