राज्य सरकार अंतर्गत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे, वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पंढरपूरला आषाढी वारीमध्ये जाणारे वारकरी यामध्ये सहभागी होऊ शकनार आहे, वारकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. व या योजनेचे नाव विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र असे ठेवण्यात आलेली आहे. व या योजनेअंतर्गत आषाढी वारीमध्ये पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे.
वारीला जात असताना कोणत्या प्रकारची दुर्घटना घडली असता वारकऱ्यांचा मृत्यू, किंवा जखमी होतात, अशावेळी वारकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते, तर दुर्घटनेने मृत्यूला सुद्धा सामोरे जावे लागते. त्यांच्या कुटुंबांना आधार मिळावा, उपचारासाठी पैसे उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्य सरकार अंतर्गत विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना राबविण्यात येणार आहे.
कसा मिळेल लाभ
वारकरी वारीला जातात, तेव्हा तीस दिवसांसाठी त्यांना संरक्षण देण्यात येणार आहे, व त्या तीस दिवसांमध्ये दुर्घटना किंवा वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यास शासन अंतर्गत 30 दिवसाच्या आत वीमा संरक्षण देण्यात येईल,हा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे.
असा मिळेल लाभ
1 | मृत्यू झाल्या | 5 लाख रु |
2 | कायमचे अपंगत्व | 1 लाख रु |
3 | अंशत: अपंगत्व | 50 हजार रु |
4 | आजारी पडल्यास | 35 हजार |