वन विभाग भरती 2022; परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | Van Vibhag Bharti 2022 Maharashtra

मित्रांनो आपल्या राज्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने वन विभाग भरती 2022 राबविण्यात येत आहे. वन विभाग भरती अंतर्गत परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा आता जाहीर करण्यात आलेले आहे. वन विभाग भरती संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असून वन विभाग भरती अंतर्गत जिल्हा करिता उपलब्ध असलेल्या जागा सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे. Van Vibhag Bharti 2022 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकाच दिवशी परीक्षा होणार असून वेळापत्रक हे खालील प्रमाणे आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने वन विभाग भरती चे संपूर्ण वेळापत्रक म्हणजेच भरतीची जाहिरात कधी निघणार तिथपासून ते वन रक्षक (वन विभाग भरती) अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र कधी मिळणार इथपर्यंतचा संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या Van Vibhag Bharti 2022 संभाव्य वेळापत्रकानुसार वन विभाग भरतीची जाहिरात 20 डिसेंबर 2022 रोजी निघणार आहे. त्यामुळे वन विभागात नोकरी मिळू इच्छिणाऱ्या तरुणांना आता भरतीची जाहिरात निघण्याकरिता जास्त वाट पाहण्याची आवश्यकता नाही.

वन विभाग भरती वेळापत्रक Forest Department Recruitment Schedule :

वन रक्षक (वन विभाग भरती) Van Vibhag Bharti 2022 Maharashtra वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

वन विभाग भरती आयोजन संभाव्य तारीख
वन विभाग भरती जाहिरात20 डिसेंबर 2022 पर्यंत
वन विभाग भरती अर्ज 31 डिसेंबर 2022 पर्यंत
ऑनलाईन परीक्षा 10 जानेवारी 2023 ते 20 जानेवारी 2023 पर्यंत
परीक्षेचा निकाल 30 जानेवारी 2023 पर्यंत लावण्यात येईल
शारीरिक चाचणी 10 फेब्रुवारी 2023 ते 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत
अंतिम यादी 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत
निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र10 मार्च पर्यंत

हा वण विभाग भरती महाराष्ट्र(Van Vibhag Bharti 2022 Maharashtra) चा संभाव्य टाईम टेबल आहे. या वेळापत्रकात थोडे फार बदल होऊ शकतात. या वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे वन विभाग भरतीची जाहिरात लवकरच निघणार असून जर तुम्ही वन विभाग भरती अंतर्गत अर्ज करणार असाल तर Van Vibhag Vanrakshak Bharti परीक्षेचा संपूर्ण अभ्यास करून डाऊनलोड करून त्याप्रमाणे आत्ताच अभ्यास सुरू करावा. 

10 जानेवारी 2023 पासून वन विभाग वनरक्षक भरती परीक्षेचे पेपर सुरू होणार असून आता आपल्याकडे फार कमी वेळ आहे. त्यामुळे येणाऱ्या वीस ते पंचवीस दिवसांमध्ये तुम्हाला वनविभाग भरतीचा प्रॉपर पद्धतीने अभ्यास करायचा आहे. वन विभाग भरतीची परीक्षा टीसीएस किंवा आयबीपीएस या कंपनी अंतर्गत होणार असून या परीक्षा मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.0.25 या प्रमाणात निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यामुळे आता तुमचे चार प्रश्न चुकले की तुमचा एक मार्क कमी होणार,  म्हणून तुम्हाला Van Vibhag Bharti Maharashtra सिरियसली अभ्यास करावा लागेल.

Van Vibhag Bharti अंतर्गत एकूण 120 मार्गाची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून 80 मार्काची शारीरिक परीक्षा असणार आहे. त्यामुळे जर आपण 120 मार्गाच्या लेखी परीक्षेचा योग्य अभ्यास केला तर त्याचा आपल्या अंतिम गुणांमध्ये नक्कीच फायदा होईल. वन विभाग भरतीच्या लेखी परीक्षा करिता 90 मिनिटांचा टाईम देण्यात येणार आहे. वन विभाग भरती अभ्यासक्रम संदर्भात त यापूर्वीच्या पोस्टमध्ये आपण माहिती जाणून घेतलेली आहे. वन विभाग भरतीच्या अभ्यासक्रमात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व  बौद्धिक चाचणी इत्यादी विषयांचा समावेश आहे.

वन विभाग भरती संपूर्ण अभ्यासक्रम डाऊनलोड करण्याची लिंक- 

वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण वनरक्षक भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रम डाऊनलोड करू शकतात. वन विभाग भरती वेळापत्रक संदर्भातील ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण नोकरी विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment