उडीद आणि मुगाच्या दरात वाढ, अजून वाढणार दर, जाणून घ्या दर | Udid Mung Market Rate

खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे, परंतु दिवसेंदिवस कडधान्याच्या म्हणजेच उडीद व मुगाच्या पेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना दिसते, व पावसाळ्यामध्ये या कडधान्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे, परंतु या कडधान्याचा साठा कमी असल्याने मात्र उडीद मुगाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते, तसेच मुगाची लागवड कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो तसेच यामुळे थोडा जास्त पाऊस झाल्याने सुद्धा मुगाच्या शेंगा खराब होतात चढतात यामुळे उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट होते हे मुख्य कारण मुगाच्या लागवड घटनेचे मुख्य कारण असू शकते.

 

राज्यातील विविध बाजार समितीमध्ये मुंगाला काय दर मिळतो आहे तसेच तज्ञांचे मत मुंग दराबाबत काय आहे, हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करूया, अमरावती बाजार समितीमध्ये मोगली जातीच्या मुगाला मिळालेला दर सात हजार रुपये एवढा होता. तर बाजार समितीमध्ये सहा क्विंटल एवढी आवक झालेली होती. अमळनेर बाजार समितीमध्ये 7200 रुपये एवढा दर चमकी जातीच्या मुगाला मिळाला पाच क्विंटल एवढी आवक मुगाची झालेली होती.

 

पातुर बाजार समितीमध्ये 7150 एवढा दर मिळालेला आहे, दोन क्विंटल एवढी मुगाची आवक बाजार समितीत झालेली होती. अकोला बाजार समितीत मुगाला 6860 रुपये एवढा दर मिळालेला असून त्या बाजार समितीतील मुगाची आवक 131 क्विंटल एवढी होती. पुणे बाजार समितीत 44 क्विंटल मुगाची आवक झालेली असून मिळालेला दर 9200 रुपये एवढा आहे.

 

नागपूर बाजार समितीमध्ये 25 क्विंटल एवढी मुगाची आवक झालेली असून, सहा हजार आठशे रुपये एवढा दर मिळाला. नांदगाव खंडेश्वर बाजार समितीत 5800 रुपये एवढा दर मिळालेला आहे, तर त्या बाजार समितीतील मुगाची आवक एक क्विंटल एवढी होती. मुर्तीजापुर बाजार समिती 6850 रुपये एवढा दर मुंगाला मिळालेला होता, अशाप्रकारे मुगाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते.

 

कांद्याच्या बाजारभावात वाढ, नाफेड ने दर जाहीर केल्यामुळे वाढ, जाणून घ्या दर