कापसापेक्षा तुरीला मिळतोय चांगला दर, शेतकऱ्यांना तूर ठरली फायदेशीर | Tur Bajar Bhav 

शेतकरी कापसापेक्षा कमी प्रमाणात तुरीची लागवड करतात, त्यामध्ये कापूस व सोयाबीन मध्ये काही पट्ट्या सोडून तुरीची लागवड केली जाते परंतु अगदी कमी प्रमाणात शेतकरी लागवड तुरीची करूनही कापसापेक्षा चांगला दर तुरीला मिळताना दिसतो, व तूर कापसापेक्षाही जास्त पैसे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मिळवून देत आहे. यावर्षी तुरीने मोठा टप्पा काठलेला असून तुरीला मिळत असलेल्या चांगल्या दराने शेतकरी मालामाल झालेले आहे. 

 

सध्याच्या स्थितीमध्ये कापसाला खूप कमी दर मिळताना दिसतो, कापसाला सात हजार दोनशे रुपये पर्यंतचा दर मिळत आहे, तसेच या प्रमाणात तूरीला 12500 रुपये एवढा दर मिळत आहे, तुरीला 7550 रुपये एवढा हमीभाव आहे त्याबरोबरच हमीभावापेक्षा मोठ्या दराने तुरीची विक्री चालू असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा ज्या शेतकऱ्यांकडे तूर आहे असे शेतकरी मालामाल होताना दिसत आहेत.

 

तुर पिकाला अत्यंत कमी खर्च लागतो व चांगला दर मिळत असल्याने तुरीचे पिक शेतकऱ्यांना चांगले परवडत आहे, परंतु या उलट मात्र कापूस पीक घेताना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो, मजुरांवर मोठा खर्च झाल्यानंतर शेतकरी कापसाचे उत्पादन काढतात, परंतु बाजारामध्ये चांगला दर मिळत नसल्याने कोणत्याही प्रकारचा चांगला फायदा शेतकऱ्यांचा कापूस उत्पादनातून मिळत नाही आहे.

 

त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये विचार करायचा झाल्यास कापूस पिकावर मोठा खर्च करून उत्पादन घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना तुरीचे पीक घेणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे, तसेच भारी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त तुरीचे उत्पादन मिळू शकते व अशा प्रकारचा दर मिळाल्यास तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.

 

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, तब्बल एक लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार