टोमॅटोच्या दरात वाढ परंतु पुढील आठवड्यात टोमॅटोचे दर कमी होण्याची शक्यता | Tomato Dar

पावसाळा चालू झालेला असून याचाच परिणाम म्हणजेच भाजीपाल्याच्या किंमती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत, भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असून, यासोबतच मागून कांदा व बटाट्याचे दर सुद्धा वाढताना दिसतात, मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे परंतु दराचा विचार करायचा झाल्यास गेल्यावर्षी याच पावसाच्या काळामध्ये टोमॅटोचे दर तब्बल दोनशे रुपये किलोच्या दरम्यान गेलेले होते परंतु आता मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली नसून थोड्या प्रमाणात वाढ झालेली आहे. 

 

टोमॅटोचे दर वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळा चालू झालेला असल्याने मोठ्या प्रमाणात पावसाने सुरुवात केलेली आहे अशा ठिकाणी विविध भागातील टोमॅटो पिकांची नुकसान पावसाने होत आहे त्याबरोबरच ज्या शेतकऱ्यांचे टोमॅटो पीक काढनीला आलेले असेल अशा शेतकऱ्यांना वेळेवर टोमॅटो तोडून बाजारामध्ये वेळेवर आणणे शक्य होत नसल्याने बाजारात टोमॅटोची टंचाई भासत आहे यामुळे टोमॅटोच्या दराला चांगला वाव मिळत आहे, कारण टोमॅटोची मागणी असल्याने टोमॅटो दर वाढत चाललेले आहे.

 

टोमॅटोला मिळत असलेला सध्याच्या स्थितीतील दर 75 रुपये किलो एवढा आहे, यासोबतच इतरही भाजीपाला पिकाचे दर वाढत आहे, पाण्यामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते काही भाजीपाला कामातूनच जातो, त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढत आहेत. देण्यात आलेल्या माहितीनुसार टोमॅटोच्या दरामध्ये येत्या आठवड्यामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण आंध्र प्रदेशातील प्रमुख उत्पादक भागातील पिकाची स्थिती चांगली दिसत असल्याने टोमॅटो उपलब्ध होऊ शकतात.

 

टोमॅटोच्या दरामध्ये वाढ होण्याचेतकारण म्हणजे पावसामुळे पिकांची नासाडी तर होतच आहे, परंतु अनेक जण काळाबाजार करून टोमॅटो साठवून ठेवत आहे, त्यामुळे बाजारात टोमॅटोची कमी असेल व टोमॅटोच्या दरात वाढ होईल अशा वेळेस अनेक जण टोमॅटो विक्रीला आणतात व चांगला दर मिळेल अशी एक प्रकारची अपेक्षा सुद्धा अनेक बाळगतात व त्यामुळे सुद्धा टोमॅटोच्या दरात वाढ होताना दिसत आहे परंतु येत्या काही दिवसात टोमॅटोचे दर थोड्या प्रमाणात उतरण्याची शक्यता आहे.

 

दूध उत्पादकांना मिळणार प्रती लिटर 30 रुपये, व 5 रुपये अनुदान