विद्यार्थी मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत बारावी पास उमेदवारांकरिता SSC CHSL Bharti आयोजित करण्यात आलेली आहे. स्टाफ सिलेक्शन अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू झालेली असून 4500 जागांकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. SSC CHSL Recruitment 2022 अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे व अर्ज करण्याची अंतिम तारीख तसेच फी या संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
SSC CHSL Recruitment अंतर्गत ही मेगा भरती होणार असून संपूर्ण देशातील उमेदवार या भरती अंतर्गत अर्ज करू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या भरती अंतर्गत जर तुम्ही बारावी पास असाल तरी सुद्धा या जॉब ला लागू शकतात.
SSC CHSL(10+2) Recruitment 2022
SSC CHSL अंतर्गत एकूण 4500 रिक्त असून यामध्ये यामध्ये खालील पदे भरण्यात येणार आहे.
- कनिष्ठ विभागीय लिपिक
- कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
- डेटा एन्ट्री ऑपरेटर
- डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड A
वरील चार पदांकरिता एकूण चार हजार पाचशे रिक्त जागा आहे.
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
- एकूण रिक्त जागा: 4500
- शैक्षणिक पात्रता: 12 वी(10+2) उत्तीर्ण
- फी: General व Obc प्रवर्ग – 100₹, Sc/st/pwd/ExSM – कोणतेही शुल्क नाही
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 04 जानेवारी 2023
- जॉब लोकेशन: भारत देश
- वयोमर्यादा: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे
- परीक्षा कोणत्या व तारीख: Tier-I: फेब्रुवारी/मार्च 2023 महिन्यात CBT टेस्ट, Tier-II: नंतर तारीख जाहीर होईल
- अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट: येथे अर्ज करा
- जाहिरात: आत्ताच जाहिरात पहा
SSC CHSL Bharti अटी व पात्रता :
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वतीने बारावी पास उमेदवारांकरिता राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रिये अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय हे 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट देण्यात येत आहे) दरम्यान असावे.
[table id=3 /]
एसएससी सीएचएसएल भरती अंतर्गत अर्ज कसा करायचा? How to apply for SSC CHSL Recruitment?
मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वतीने बारावी पास उमेदवारांकरिता राबविण्यात येणाऱ्या या मेगा भरती अंतर्गत सदर पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. SSC CHSL Recruitment 2022 अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी सदर उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती तसेच पात्रता यांची माहिती वाचून घ्यावी. SSC Recruitment अंतर्गत खालील प्रकारे ऑनलाईन अर्ज करा.
- सर्वप्रथम वर दिलेल्या स्टाफ सिलेक्शन च्या वेबसाईटवर जा.
- आता तुमच्यासमोर या वेबसाईटची होम पेज ओपन झालेले आहे त्यामध्ये नवीन उमेदवार नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमच्या सर्व वैयक्तिक तसेच कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन व इतर माहिती टाकून आधी नोंदणी करून घ्यायची आहे.
- आता तुम्हाला username आणि password मिळालेला असेल, हा युजरनेम आणि पासवर्ड जपून ठेवावा.
- आता तुमच्या युजरनेम आणि पासवर्ड च्या साह्याने लॉगिन करून घ्या.
- आता लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर सर्वात पहिला एक ऑप्शन दिसत असेल SSC CHSL Recruitment 2022 या ऑप्शन खाली आपल्या ऑनलाइन या पर्यायावर क्लिक करून.
- ऑनलाइन फॉर्म व्यवस्थितपणे भरा, आता तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर अपलोड करा.
- शेवटी अर्जाची फी पेड करावी व आपण भरलेल्या फॉर्म ची प्रिंट तसेच फी भरल्याची चलन पावती यांची प्रिंट काढा, किंवा ते pdf मध्ये सेव करून ठेवा.
- SSC CHSL Bharti अंतर्गत अर्ज भरल्याचा एसएमएस तुम्हाला प्राप्त झालेला असेल.
SSC CHSL Recruitment अंतर्गत कोण अर्ज करू शकतो?
SSC CHSL Recruitment 2022 अंतर्गत संपूर्ण भारत देशातील 12 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
SSC CHSL Bharti परीक्षा पद्धती:
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या SSC CHSL Recruitment अंतर्गत उमेदवारांचे दोन पेपर होतील. पहिला पेपर हा ऑनलाइन पद्धतीने CBT म्हणजेच कम्प्युटर वर टेस्ट होईल. ही एक्झाम Tier-I असेल त्यांनतर Tier-I ही एक्झाम चे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांना Tier-II एक्झाम द्यावी लागेल. Tier-I ही परीक्षा 2023 च्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात आयोजित करण्यात येईल.
स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या भरती अंतर्गत आपल्या महाराष्ट्र जे उमेदवार बारावी पास झालेल्या आहेत त्यांच्यासाठी सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. अंतिम तारखेची वाट न पाहता उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण की मागील स्टाफ सिलेक्शनच्या भरतीमध्ये शेवटचे पाच दिवस आयोगाची वेबसाईट डाऊन झाल्यामुळे कुणालाही अर्ज करता आला नव्हता. त्यामुळे अंतिम तारखेची वाट न पाहता पहिल्या आठ दिवसातच अर्ज करून घ्यावा.