सोयाबिन टोकण पद्धतीने लागवड करा, उत्पादनात होईल मोठी वाढ | Soyabin Lagvad

.राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते परंतु दिवसेंदिवस आधुनिक पद्धतीत चाललेली असल्याने, शेतकऱ्यांना उत्पादनात भर पडावी, या उद्देशाने विविध प्रकारच्या पद्धती सोयाबीनच्या लागवडीसाठी वापरल्या जातात, त्यातीलच एक लागवड पद्धत म्हणजेच टोकन पद्धतीने केलेली सोयाबीनची लागवड, यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड करण्यावर भर दिलेला आहे, या पद्धतीने सोयाबीनची लागवड केल्यास शेतकऱ्यांचा होणारा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. 

 

टोकण पद्धतीने बियाणे लागवड करण्यासाठी सर्वप्रथम ट्रॅक्टरने शेतामध्ये बेड पाडून घ्या. बाजारामध्ये टोकन यंत्र उपलब्ध झालेली आहे, त्या यंत्राची खरेदी करून किंवा इतर शेतकऱ्यांकडून आणून त्या टोकण यंत्राच्या माध्यमातून अगदी चार इंचावर एक बी अशा पद्धतीने सोयाबीनची लागवड होते, यात मुख्य बाब म्हणजे एकरी लागणारे बी खूप कमी प्रमाणात लागतील व एकसारख्या अंतरावर संपूर्ण बी लागल्याने त्या पिकाला पाण्याची उपलब्धता ठिबक सिंचनाच्या माध्यमातून करून देणे शेतकऱ्यांना अगदी शक्य होते.

 

शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीने सोयाबीन ची लागवड केल्यास शेतामध्ये कमी बियाण्याबरोबरच प्रत्येक झाडाची चांगल्या पद्धतीने वाढ होऊन, प्रत्येक झाडाच्या बुडापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचतो, तसेच झाड फांद्या करत मोठ्या संख्येने त्या झाडाला शेंगा लागतात व उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडते, त्याच पद्धतीने एखाद्या वेळेस पाणी न आल्याने शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्याचे काम पडले तर सऱ्या पाडलेल्या असल्यामुळे म्हणजेच बेडच्या माध्यमातून अगदी सहजरीत्या पाण्याचा पुरवठा सुद्धा केला जाऊ शकतो.

 

राज्यातील विविध भागांमध्ये टोकन यंत्राच्या माध्यमातून सोयाबीनच नव्हे तर विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जात आहे तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल म्हणजे सोयाबीनची लागवड करू इच्छित असाल तर तुम्हाला टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

 

शेतकरी बांधवांनो आता घरी बसूनच करा पिक पेरा ची नोंद, अशी करा पिक पेरा नोंद