SIDBI बँक भरती 100 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू | SIDBI Recruitment 2022

मित्रांनो स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच सीड बी(SIDBI) यांच्या वतीने असिस्टंट जनरल मॅनेजर या पदाच्या 100 जागांकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. SIDBI Recruitment अंतर्गत पात्र व इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 03 जानेवारी 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. सिडबी बँक भरती संदर्भात अधिकृत notification बँकेच्या वतीने 13 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. तर चला जाणून घेऊया सिडबी बँक भरती संदर्भात विस्तृत माहिती.

सिडबी बँकेच्या SIDBI वतीने राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेची अधिकृत notification ही बँकेने त्यांच्या www.sidbi.in या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे. ज्या भरती अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून भरतीची जाहिरात विस्तृतपणे वाचून घ्यावी व आपण या भरती अंतर्गत पात्र असेल तर शेवटच्या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने बँकेचे अधिकृत पोर्टलवर अर्ज सादर करावा.

भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेला सामोरे जावे लागेल परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल आणि मुलाखतीस तुम्ही पात्र ठरल्यास तुम्हाला 70 हजार रुपये महिना मिळवून देणारी नोकरी मिळू शकते. या भारतीय अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच अटी व शर्ती आणि पात्रता या संदर्भात विस्तृत माहिती खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

SIDBI Recruitment 2022 Details:

एकूण जागा: 100

पदाचे नाव: असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड A

वयोमर्यादा: 21 ते 28 वर्ष(SC आणि ST या उमेदवारांना पाच वर्षे सुट तर OBC उमेदवारांना तीन वर्षे सूट)

अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 03 जानेवारी 2023

वेतन: 70,000/- दरमहा

अर्ज फी: 1100 रुपये(अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती आणि अपंग उमेदवारांना 175 रुपये अर्ज फी आहे)

SIDBI Recruitment अंतर्गत शैक्षणिक पात्रता Educational Qualification under SIDBI Recruitment:

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक Sidbi bharti ऑफ इंडिया यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे.

1. उमेदवारांनी कॉमर्स किंवा इकॉनॉमिक्स या विषयातून पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. ही पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेली असावी.

2. उमेदवारांनी कायदेविषयक पदवी मिळवलेली असावी.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 1744 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरू

अर्ज कसा करायचा? How to apply for sidbi Bank recruitment

भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती(sidbi recruitment) अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे. या भारतीय अंतर्गत उमेदवारांना अर्ज हा 3 जानेवारी 2023 पूर्वी करायचा आहे. या तारखेनंतर बँकेच्या वतीने अर्ज करण्याची वेबसाईट बंद करण्यात येईल, त्यामुळे अर्ज करताना शेवटची तारीख लक्षात ठेवावी.

SIDBI Recruitment महत्त्वाच्या तारखा:

1. अर्ज सुरू होण्याची दिनांक 14 डिसेंबर 2022

2. ऑनलाइन एक्झाम जानेवारी 2023 किंवा फेब्रुवारी 2023

3. इंटरव्यू फेब्रुवारी 2023

sidbi बँक भरती निवड प्रक्रिया sidbi bank recruitment selection process

मित्रांनो स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया अंतर्गत सुरुवातीला पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्यानंतर बँकेकडे प्राप्त झालेल्या अर्जावर बँक छाननी करेल त्यानंतर उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. ऑनलाइन परीक्षा ही 250 मार्काची असेल त्याकरिता 163 प्रश्न विचारण्यात येणार आहे. जे उमेदवार या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील अशा उमेदवारांना म्हणजेच या परीक्षेतील कट ऑफ मध्ये बसलेल्या उमेदवारांना इंटरव्यू द्यायचा आहे. इंटरव्यू मधून पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येईल.

या बँक भरती अंतर्गत उमेदवारांची अंतिम निवड ही मुलाखतीच्या आधारावर होणार आहे. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण झाले तरीसुद्धा उमेदवारास मुलाखत द्यावीच लागते.

अर्ज करण्याची वेबसाईट- 

sidbi recruitment 2022 notification:-

sidbi recruitment यांच्यामार्फत भरतीची अधिकृत जाहिरात ही जाहीर करण्यात आलेली आहे. sidbi recruitment 2022 notification डाउनलोड करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

सिडबी बँक भरती अभ्यासक्रम sidbi bank recruitment syllabus:

सिडबी(sidbi) बँकेच्या वतीने ऑनलाईन परीक्षा आहे 250 मार्काची होणार असून त्याकरिता 163 प्रश्न विचारण्यात येणार आहे. 163 प्रश्न खालील विषयांमधून विचारण्यात येणार आहे.

1. इंग्रजी विषयाचे 30 प्रश्न आणि 30 मार्गाचे

2. जनरल अवेअरनेस 50 मार्गाचे 50 प्रश्न

3. रीजनिंग 60 मार्गाची 40 प्रश्न असतील

4. Quant 60 मार्गाचे 40 प्रश्न

5. डिस्क्रिप्टिव चे 3 प्रश्न असतील 50 मार्काचे

अशाप्रकारे एकूण 163 प्रश्न असतील त्याला एकूण 250 मार्क असणार आहे.

sidbi भरती संदर्भात विस्तृत माहिती करिता अधिकृत जाहिरात वाचुन घ्यावी, नंतर अर्ज करायचं आहे. ही एक मेगा भरती हा असणार आहे.


Notification डाऊनलोड करण्याची लिंक- 

ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अश्याच नोकरी विषयक माहिती करिता या वेबसाइट वर भेट देत रहा.

Leave a Comment