पुणे महानगरपालिका शिक्षक भरती | Pune Mahanagarpalika Shikshak Bharti

पुणे महानगरपालिकेच्या वतीने 124 रिक्त जागांकरिता शिक्षक भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली आहे. शिक्षक भरती महानगरपालिका पुणे अंतर्गत माध्यमिक, उच्च माध्यमिक व रात्र शाळांमध्ये शिक्षकांची भरती होत आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने महानगरपालिकेच्या वतीने ठरवून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. पुणे महानगरपालिका शिक्षक भरती संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेत आहोत.

महानगरपालिका पुणे यांच्यामार्फत विविध पदांकरिता शिक्षक भरतीची अधिकृत जाहिरात काढण्यात आलेली आहे. महानगरपालिका पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येणारी ही शिक्षक भरती करार पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात राबविण्यात येत आहे. Pune Mahanagarpalika Shikshak Bharti अंतर्गत वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 124 शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. शिक्षक भरती पुणे या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखांमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे.

Pune Municipal Corporation is conducting teacher recruitment for various posts. Interested and eligible candidates are invited to apply under this recruitment. The detailed information of this recruitment is given below.

महानगरपालिका पुणे शिक्षक भरती Pune Mahanagarpalika Shikshak Bharti Details

एकूण रिक्त जागा: 124

1. मराठी माध्यम: 82

2. उर्दू माध्यम: 17

3. उच्च माध्यमिक विभाग: 11

4. रात्र शाळा: 03

5. उच्च माध्यमिक मराठी माध्यम: 11

अर्ज सुरू होण्याचा दिनांक: 19 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 डिसेंबर 2022

अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर

भरती प्रकार: शिक्षक भरती (करार पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात)

महानगरपालिका पुणे शिक्षक भरती अर्ज कुठे मिळेल? Where to get Municipal Corporation Pune Teacher Recruitment Application Form?

पुणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महानगरपालिका पुणे शिक्षक भरती अंतर्गत सदर पात्र उमेदवारांना विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज करायचा आहे. महानगरपालिका पुणे शिक्षक भरतीचा अर्जाचा नमुना आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून देत आहोत. या भरती संदर्भात अधिकृत माहिती तसेच इतर माहितीकरिता महानगरपालिकेचे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज डाउनलोड करा-

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती अर्ज पाठवण्याचा पत्ता:

या Pune Mahanagarpalika Teacher Recruitment 2022 अंतर्गत उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. या भरती अंतर्गत अर्ज हे केवळ ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील स्वीकारण्यात येणार आहे. ईमेल किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.

पत्ता :

शिक्षणाधिकारी,माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय,भाऊसाहेब शिरोळे भवन,जुना तोफखाना शिवाजीनगर पुणे – 411005.

वरील पत्त्यावर तुम्ही पोस्टाने अर्ज पाठवू शकता किंवा स्वतः जाऊन अर्ज सबमिट करू शकतात.

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती अधिकृत जाहिरात:

पुणे महानगरपालिका यांच्या वतीने भरतीची अधिकृत जाहिरात हे वृत्तपत्र आणि त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केलेली आहे. महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या Pune Mahanagarpalika Shikshak Bharti अंतर्गत ज्या शिक्षक उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी भरतीची संबंधित ही जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यावी या जाहिरातीमध्ये विविध पदे दिलेली आहेत. त्यापैकी आपण ज्या पदांकरिता पात्र ठरतो त्याकरिता अर्ज करावा.

Bharti notification डाऊनलोड

भरती संदर्भात महत्त्वाच्या तारखा:

1. या भरती अंतर्गत 19 डिसेंबर 2022 पासून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

2. उमेदवारांकडून 28 डिसेंबर २०२२ दुपारी दोन वाजे पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

वरील दिलेल्या तारखा नुसार ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

उमेदवारांकरिता सूचना:

1. या भारतीय अंतर्गत सदर उमेदवारांना माध्यमनिहाय शिक्षकांकरिता अर्ज करायचा आहे. च्या माध्यमातून तुम्ही पात्र आहात त्याच पदाकरिता अर्ज करावा.

2. प्रत्येक माध्यम निहाय शिक्षकांच्या पदाकरिता वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असल्यामुळे उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली सर्व शैक्षणिक पात्रता पाहून आपल्या शैक्षणिक अर्हता प्रमाणे त्या पदाकरिता अर्ज करावा.

3. अर्ज हे दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने शेवटच्या तारखेच्या आत उमेदवारांना स्वतः जाऊन जमा करायचे आहे.

4. या भरती प्रक्रियेमध्ये पदांची संख्या कमी जास्त करणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे किंवा बदल करण्याचे अधिकार महानगरपालिकेकडे आहे.

5. अंतर्गत ही भरती करार पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अश्या प्रकारे आपल्याला वरील सूचनांचे पालन करायचे आहे. या Pune Mahanagarpalika Teacher Recruitment संदर्भात विस्तृत माहिती जाणून घ्यायची असल्यास आम्ही खाली महानगर पालिकेची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे. ती चेक करावी.

अधिकृत वेबसाईट – 

वरील वेबसाईट वर भरतीच्या अटी, शर्ती व पात्रता तसेच संपूर्ण तपशील दिलेला आहे. ही माहिती सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अश्याच जॉब आणि नोकरी विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment