पी एम किसान चे शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा, असे चेक करा, तुम्हाला मिळाले का | Pm Kisan Payment Check 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 जून 2024 रोजी देशातील पीएम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे, त्यामुळे हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे, तुम्हाला हप्ता मिळाला आहे की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचे याची संपूर्ण प्रोसेस खालील प्रमाणे दाखवण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही जर पीएम किसान योजनेअंतर्गत मिळालेल्या या हप्त्यात पात्र ठरले असाल तर डीबीटी च्या माध्यमातून तुमच्या खात्यावर पैशाची वितरण झालेले असेल. 

 

चेक करण्यासाठी गुगल वर जाऊन पी एफ एम एस असे सर्च करून पहिली वेबसाईट ओपन करावी. त्यामध्ये पेमेंट स्टेटमेंट या ऑप्शनवर क्लिक करून त्याखालील डीबीटी स्टेटस ट्रॅकर हे ऑप्शन निवडा. त्यानंतर कॅटेगिरी म्हणजेच योजनेचे नाव निवडा व पेमेंट स्टेटस या ऑप्शन वर क्लिक करा, त्यानंतर एप्लीकेशन आयडी अर्थातच पीएम किसान योजनेचा रजिस्टर क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करावा लागणार आहे.

 

कॅपच्या कोड जशास तशा टाकून सर्च बटन वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पेमेंट डिटेल्स दिसेल, त्यानंतर संपूर्ण माहिती तुमच्यासमोर ओपन होणार आहे, त्यामध्ये कोणता हप्ता तुमच्या खात्यावर जमा झालेला आहे, तसेच हप्ता जमा होण्याची तारीख तसेच किती रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे, हे त्या ठिकाणी कळणार आहे.

 

तूम्ही एकच मोबाईल मध्ये 2 सिम वापरता, आता नवीन नियमात बदल, लागेल शुल्क, पहा काय आहे नियम