कांद्याच्या बाजारभावात वाढ, नाफेड ने दर जाहीर केल्यामुळे वाढ, जाणून घ्या दर | Onion Rate

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, नाफेडच्या माध्यमातून आठवड्यातील कांद्याचे दर जाहीर केल्यानंतर, कांद्याच्या दरामध्ये बाजार समितीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, तसेच कांदा दराचा विचार करायचा झाल्यास गेल्या आठवड्यामध्ये कांद्याचे दर राज्यातील विविध बाजार समितीमध्ये 2400 ते 2500 रुपये एवढा दर दिसत होता परंतु नाफेडच्या माध्यमातून कांद्याचे दर जाहीर करण्यात आलेले असताना बाजार समितीत कांद्याला चांगला दर मिळतोय. 

 

राज्यातील विविध बाजार समितीमध्ये नाफेड चे भाव जाहीर झाल्यानंतर कांद्याला काय दर मिळतोय तसेच कांद्याची आवक किती क्विंटल होत आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया तसेच सर्वात जास्त दर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेला आहे, व कांद्याची आवक किती झालेली आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

 

पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त दर मिळालेला आहे, त्यामध्ये 3500 रुपये एवढा दर मिळालेला असून, सरासरी दर 3150 रुपये एवढा मिळाला. 15400 क्विंटल एवढी बाजार समितीतील कांद्याची आवक होती. लासलगाव बाजार समितीमध्ये 3251 रुपये एवढा कांद्याला दर मिळाला व सरासरी दर 3051 एवढा होता. 11271 क्विंटल एवढी कांद्याची आवक झालेली होती.

 

लासलगाव विंचूर या ठिकाणी कांद्याला 3300 रुपये एवढा दर मिळालेला असून सरासरी दर 3051 रुपये एवढा होता व बाजार समितीतील आवक 12200 क्विंटल एवढी होती. सोलापूर बाजार समितीमध्ये 3200 रुपये एवढा कांद्याला दर मिळालेला असून, 2200 रुपये एवढा सरासरी दर मिळाला. 5037 क्विंटल एवढी कांद्याची आवक होती. अशाप्रकारे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये वरील प्रमाणे कांद्याला दर मिळताना दिसतो, पूर्वीपेक्षा आताचे कांद्याचे दर चांगल्या प्रमाणात वाढलेले आहे, याचा फायदा अर्थातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होईल.