शेतकरी साठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे, मागील आठ महिन्यांमध्ये झालेले नुकसान भरपाईसाठी, अनुदान वितरित करण्याचे हवे यासंबंधी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला होता, व त्याच्या संबंधित घोषणा करण्यात आलेली होती, व आता 20 जूनला या संबंधित जीआर काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये 14 जिल्ह्यातील 26,50,951 शेतकऱ्यांसाठी सततच्या पावसाचे अनुदान वितरित करण्यास 1500 कोटी रुपयाचे अनुदान वितरित करण्यासंबंधी जीआर काढण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल कोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहे, या निघालेल्या जीआर मध्ये एकूण 14 शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांपर्यंत हा निधी कधी पोहोचणार हे प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित झालेले असेल परंतु आपण या संबंधित माहिती बघणार आहोत, त्याचबरोबर यामध्ये एकूण 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे व 14 जिल्ह्यातील 26,50,951 शेतकऱ्यांना अनुदानास पात्र ठरविण्यात आलेली आहे.
प्रति हेक्टर एवढा रुपये निधीचे वाटप होणार
निघालेल्या जीआर मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे,की प्रति हेक्टर 8500 रुपये या दराने शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे, त्याचबरोबर हे अनुदान फक्त दोन हेक्टर पर्यंत मर्यादित असणार असून, प्रति शेतकरी मर्यादेत मध्ये अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे.
अनुदाना मध्ये या 14 जिल्ह्यांचा समावेश
क्र | जिल्हे | पात्र शेतकरी | रक्कम (रू लक्ष) |
1 | अहमदनगर | 292751 | 24101.43 |
2 | अकोला | 133656 | 8672.70 |
3 | अमरावती | 203121 | 12957.36 |
4 | छ संभाजीनगर | 401446 | 22698.11 |
5 | बीड | 437688 | 19503.27 |
6 | बुलढाणा | 268323 | 11490.29 |
7 | जळगाव | 62859 | 4514.73 |
8 | जालना | 214793 | 13422.28 |
9 | नागपूर | 6161 | 623.23 |
10 | नाशिक | 112743 | 2583.36 |
11 | धाराशिव | 216013 | 13707.58 |
12 | परभणी | 188513 | 7037.32 |
13 | सोलापूर | 49168 | 4689.85 |
14 | वाशिम | 63716 | 3998.49 |
