शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, शासनाच्या वतीने 1700 कोटीचे पॅकेज मंजूर | Nukasan Bharpai 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, 2023 मध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, व अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक प्रकारे नुकसान भरपाई चे वाटप केले जाणार आहे, कारण 2023 च्या हंगामामध्ये शेती पीकाचे नुकसान कमी पावसामुळे झालेली होते, कारण चांगला पाऊस न आल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती, त्याबरोबरच शेती पिकांचे मोठे नुकसान या काळात झालेले असताना त्यांना आता नुकसान भरपाई दिली जाईल. 

 

2023 मध्ये काही भागात मोठ्या प्रमाणात पूर सदृश्य परिस्थिती व अतिवृष्टी झालेली होती, अशा स्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आलेले आहे 1700 कोटी रुपयांचे नुकसान भरपाईचे वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात आलेले असून पावसाच्या खंडामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांना आता मंजूर झालेल्या निधीमधून नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

 

शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाल्याने एक प्रकारची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे, तसेच यामुळे शेतकरी चांगला जोमाने आपल्या पिकाची संरक्षण व आपल्या पिकावर खर्च करून उत्पादनात वाढ करू शकेल, अशा प्रकारची शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून नुकसान भरपाईचे वाटप शेतकऱ्यांना केले जाईल.

 

पीक पेरा प्रमाणपत्र 2024, पिक विमा भरण्यासाठी आवश्यक, पिक पेरा स्वघोषणा पत्र मिळवा मोबाईल वर