छावणी परिषद देवळाली नाशिक भरती | Nashik Cantonment Board Bharti

मित्रांनो छावणी परिषद देवळाली यांच्यामार्फत विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. नाशिक कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून या पदभरती मध्ये सातवी पास ते ग्रॅज्युएट असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील छावणी परिषद मध्ये नोकरी मिळू इच्छिणाऱ्या तरुणांकरिता ही एक चांगली संधी निर्माण झालेली आहे. मित्रांनो या Deolali Cantonment Board Bharti Nashik अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच पात्रता व पदांचा तपशील ही सर्व माहिती या पोस्टमध्ये आपण जाणून घेत आहोत.

Daily Bharti

मित्रांनो या पदभारती अंतर्गत किमान सातवी पास असणारा उमेदवार अर्ज करून 15000 पेक्षा जास्त पगार मिळवू शकतो. विविध पदांकरिता या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक तसेच पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

छावणी परिषद भरती नाशिक संपूर्ण तपशील Deolali Cantonment Board Bharti :

एकूण रिक्त जागा: 26

शैक्षणिक पात्रता:- किमान सातवी पास ते पदवीधर (शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असून वेगवेगळ्या पदांकरिता वेगवेगळे शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी)

अर्ज फी:

सर्वसाधारण प्रवर्ग 700 रुपये

मागासवर्गीय/महिला/ट्रान्सजेंडर 350 रुपये

वेतन:- 15,000 ते 1,77,500 (वेतन हे पदानुसार मिळणार असून तुमची ज्या पदाकरिता निवड होईल त्यानुसार तुम्हाला वेतन मिळेल.)

वयोमर्यादा: कमीत कमी वय 21 जास्तीत जास्त 35 वर्षे

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 13 जानेवारी 2023

पदांचा तपशील (Deolali Cantonment Board Bharti)

पदउपलब्ध जागा
जनरल सर्जन01 जागा
जनरल फिजिशियन 01 जागा
विशेषज्ञ 02 जागा
लॅब तंत्रज्ञ01 जागा
भूलतज्ज्ञ 01 जागा
नेत्ररोगतज्ज्ञ 01 जागा
दंत शल्यचिकित्सक 01 जागा
केमिकल मजदूर 01 जाग
सहाय्यक आरोग्य निरीक्षक 01 जागा
चौकीदार 02 जागा
सहायक मेकॅनिक 01 जागा
फिटर 01 जागा
प्रयोगशाळा परिचर – 01 जागा
मजदूर/ मदतनीस 02 जागा
वाल्वमॅन 01 जागा
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) 01 जागा
ड्राफ्ट्समन (ग्रेड II) 02 जागा
क्लिनर 02 जागा
सुतार 01 जागा
चित्रकार01 जागा


छावणी परिषद देवळाली भरती अर्ज कसा करायचा?

मित्रांनो नाशिक कॅन्टोन्मेंट बोर्ड (Nashik Cantonment Board Bharti) देवळाली यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या पदभरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज हा डाऊनलोड करून तो अर्ज व्यवस्थितपणे भरून त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून पोस्टाच्या माध्यमातून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. या भरती अंतर्गत अर्ज हा स्पीड पोस्टाने पाठवा. तुमचा अर्ज अंतिम तारखेच्या आत पोहचला पाहिजे. अर्ज हा लिफाफ्यात पॅक करून सेंड करा. लिफाफ्यावर कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे, याचा उल्लेख करावा.

रुक्मिणी सहकारी बँक भरती; थेट मुलाखती द्वारे भरती सुरू

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

मित्रांनो छावणी परिषद Deolali Cantonment Board Bharti अंतर्गत ऑफलाईन अर्ज हा तुम्हाला खालील पत्त्यावर जमा करायचा आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, कनॉट रोड, देवळाली कॅम्प (नाशिक) 422401

वरील पत्यावर अर्ज पाठवा. तुमचा अर्ज अंतिम तारखेच्या आत या पत्त्यावर गेला पाहिजे. मित्रांनो या पदभरती प्रक्रिया अंतर्गत केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणारा जर तुम्ही अर्ज करणार असाल तर अंतिम तारखेच्या किमान पाच ते सात दिवस अगोदर अर्ज करावे जेणेकरून तुमचा अर्ज तुम्ही पोस्टाने पाठवल्यास तो अंतिम तारखेच्या आत पोहोचेल. पोस्टाने अर्ज पाठवताना शक्यतो अर्ज हा स्पीड पोस्टाने पाठवा जेणेकरून अर्ज पोहोचण्यास वेळ होणार नाही. CB Deolali Recruitment 2023

अधिकृत वेबसाईटआत्ताच जा
अर्ज डाऊनलोड कराआत्ताच जा
जाहिरात डाऊनलोड कराआत्ताच जा


उमेदवारांकरिता सूचना Deolali Cantonment Board Bharti Nashik Instructions:

देवळाली छावणी परिषद भरती अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर खालील महत्त्वाच्या सूचना नक्की वाचून घ्या.

1. ज्याप्रमाणे या भरती प्रक्रियेच्या अधिकृत जाहिरातीमध्ये अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिलेला आहे त्याचप्रमाणे विहित नमुन्यातील अर्ज करायचा आहे.

2. उमेदवारांनी अर्जामध्ये माहिती अचूकपणे पुरवावी.

3. जर उमेदवारांनी चुकीची माहिती उपलब्ध करून दिल्यास किंवा माहिती खोटी आढळल्यास सदर उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे.

4. उमेदवारांनी या भरती प्रक्रिया अंतर्गत अर्ज करण्याकरिता भरलेले शुल्क परत मिळणार नाही.

5. अर्ज करण्यापूर्वी सदर उमेदवारांनी या भरती प्रक्रिया अंतर्गत जाहीर करण्यात आलेली मूळ जाहिरात वाचून घ्यावी नंतरच अर्ज करावा.

अशाप्रकारे महाराष्ट्र राज्य छावणी परिषद देवळाली नाशिक यांच्यामार्फत ही विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेमुळे किमान सातवी पास असलेल्या तरुणांना सुद्धा अर्ज करण्यात येत असल्यामुळे ही महाराष्ट्रातील उमेदवारांकरिता महत्त्वपूर्ण अशी संधी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही या Nashik Cantonment Board Bharti Maharashtra अंतर्गत पात्र ठरत असाल तर अंतिम तारखेच्या आत लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे.

वन विभाग भरती 2022; परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

ही माहिती माहिती तुमच्या इतर मित्रांना देखील नक्की शेअर करा. अशाच नोकरी विषयक माझी नोकरी संदर्भात तसेच माझी जॉब संदर्भात माहिती करता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment