एस टी महामंडळ भरती 2022 | MSRTC Bharti Mumbai

मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मुंबई येथील आगाराकरिता भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या एसटी महामंडळ भरती अंतर्गत किमान आठवी ते दहावी पास असलेल्या उमेदवारांना सुद्धा अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत आयटीआय झालेल्या उमेदवारांना शिकाऊ प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही msrtc recruitment 2022 maharashtra एसटी महामंडळ यांच्यावतीने अप्रेंटिस पदाकरिता राबविण्यात येणारी भरती असून इच्छुक पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MSRTC Mumbai Bharti अंतर्गत राज्यातील एसटी महामंडळाच्या विभागामध्ये नोकरी मिळू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता ही एक सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. एस टी महामंडळाच्या वतीने अप्रेंटिस या पदांमध्ये नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी निर्माण झालेली आहे. ही पद भरती प्रक्रिया विविध पदांकरिता राबविण्यात येत असून उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पोस्टमध्ये आपण विविध पदांकरिता अर्ज करण्याची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे.

एस टी महामंडळ भरती मुंबई तपशील:

पदांचे नाव:

1. मेकॅनिक

2. इलेक्ट्रिशियन

3. शील मेटल वर्कर

अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन

वेतन: शासनाच्या नियमानुसार शिकाऊ उमेदवारांना मिळणारे वेतन किमान 5 हजार ते जास्तीत जास्त 10 हजार पर्यंत.

शैक्षणिक पात्रता:

1. किमान आठवी ते दहावी उत्तीर्ण

2. संबंधित विषयात आयटीआय

नोकरी ठिकाण: मुंबई येथे

अर्ज सुरू झाल्याची तारीख तारीख: 13 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची अंतिम तारीख: या पदभरती अंतर्गत सध्या अर्ज सुरू असून अंतिम तारीख ही वेबसाईटवर लवकरात लवकर प्रकाशित करण्यात येईल.

एस टी महामंडळ भरती मुंबई अंतर्गत वयोमर्यादा MSRTC Recruitment:

मित्रांनो जर तुम्ही या पदभरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार म्हणून अर्ज करणार असाल तर तुमचे कमीत कमी वय हे 18 वर्षे तसेच जास्तीत जास्त 35 वर्षे असावे लागते. या वयोमर्यादीमध्ये मागासवर्गीय जर उमेदवार असेल तर त्या पाच वर्षे सूट देण्यात येते. म्हणजेच अर्ज करणार उमेदवार हा जर मागासवर्गीय या प्रवर्गातून असेल तर त्याला जास्तीत जास्त 40 वर्षे वय असले तरी अर्ज करता येतो.

महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग भरती अर्ज प्रक्रिया:-

महाराष्ट्राचे परिवहन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या एसटी महामंडळ भरती(st mahanandal bharti) मुंबई अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत तीन पदान करिता वेगवेगळ्या अर्ज करायचा असून ज्या पदांकरिता तुम्ही पात्र आहात त्या पदाकरिता अर्ज करा. एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या पदभरती अंतर्गत अर्ज करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

इलेक्ट्रिशियन – ऑनलाइन अर्ज करा

मेकॅनिक – ऑनलाइन अर्ज करा

शील मेटल वर्कर – ऑनलाइन अर्ज करा

मित्रांनो वरील तीन पदांपैकी तुम्ही ज्या पदांमध्ये शैक्षणिक दृष्ट्या पात्र आहात त्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. या भरती अंतर्गत तुमची निवड केवळ शिकाऊ उमेदवार म्हणून करण्यात येत आहे. ही पदभरती कायमस्वरूपी नसून या भरती अंतर्गत ठराविक कालावधी करिताच तुम्हाला त्या पदावर राहता येईल.

उमेदवारांकरिता महत्त्वपूर्ण सूचना:

1. या भरती अंतर्गत उमेदवारांना केवळ ऑनलाइनच अर्ज करता येणार असून इतर मार्गांनी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

2. वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरूनच उमेदवारांनी त्या पदाकरिता अर्ज करायचे आहेत.

3. उमेदवारांनी अर्जामध्ये त्यांची माहिती योग्य व अचूक द्यावी.

4. सदर उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून अंतिम तारखेच्या आत अर्ज करायचे आहे.

5. ही भरती प्रक्रिया प्रशिक्षणाकरिता असून तुमची निवड शिकाऊ उमेदवार म्हणून होईल.

6. या भरती अंतर्गत तुमचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या पदापासून दूर करण्यात येईल.

7. या पदभरती अंतर्गत तुम्ही प्रशिक्षण घेतले म्हणजे तुम्हाला राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत सामावून घेतले जाणार नाही.

8. या भारती संदर्भात संपूर्ण अधिकार आहे राज्य परिवहन महामंडळाने राखून ठेवलेले आहेत.

मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यात एस टी महामंडळ भरती 2022 महाराष्ट्र(st mahanandal bharti maharashtra) अंतर्गत मुंबई येथील विभागाकरिता विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या शिकाऊ उमेदवारी भरती प्रशिक्षणांतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करावा.

ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच नोकरी विषयक तसेच जॉब अपडेट विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment