महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती; फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड | MIDC Bharti Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने विविध पदांकरिता मेगा भरती राबविण्यात येत आहे. या MIDC Bharti अंतर्गत उमेदवारांची निवड ही फक्त मुलाखत घेऊनच होणार आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्याकरिता उमेदवारांना दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले असून उमेदवार ऑफलाइन किंवा ऑनलाईन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने राबवण्यात येणारे ही MIDC Bharti Maharashtra करार पद्धतीने म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना पुनर्नियुक्त करण्याचे अधिकार एमआयडीसी कडे असेल.

Maharashtra Industrial Development Corporation is conducting recruitment process for various posts. The application process along with the required qualifications and other details under this recruitment are as follows.

एमआयडीसी भरती तपशील:

एकूण रिक्त जागा: 34

पदांचे नाव:

1 . संचालक (संचलन)

2. कार्यकारी अभियंता (स्थापत्य)

3. उप अभियंता (स्थापत्य)

4. उप अभियंता (विद्युत व यांत्रिकी)

5. लेखा अधिकारी

6. वरिष्ठ लेखापाल

7. क्षेत्र व्यवस्थापक

8. सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक

9. लघुलेखक (उ.श्रेणी)

10. लघुलेखक (नि.श्रेणी)

11. प्रमुख भूमापक

12. भूमापक

अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन/ऑनलाइन

वेतन: midc नियमानुसार

वयोमर्यादा: कमीत कमी 58 जास्तीत जास्त 70

अर्ज सुरू झाल्याचा दिनांक: 19 डिसेंबर 2022 आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 डिसेंबर 2022 आहे.

निवड प्रक्रिया: मुलाखती द्वारे

पदांचे नावरिक्त जागापात्रता व अनुभव
1 . संचालक (संचलन) विद्युत 01 जागा मुख्य अभियंता (विद्युत) / वरिष्ठ पदावरील कामाचा अनुभव
2 . कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 02 जागा कार्यकारी अभियंता (स्था) या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव
3 . उप अभियंता (स्थापत्य) 04 जागा उप अभियंता (स्था) या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव
4 . उप अभियंता (विद्युत व यांत्रिकी)02 जागा उप अभियंता (विद्युत व यांत्रिकी) या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव
5 . लेखा अधिकारी05 जागा लेखा अधिकारी या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव
6. . वरिष्ठ लेखापाल 05 जागावरिष्ठ लेखापाल या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव
7 . क्षेत्र व्यवस्थापक 05 जागासंबंधित पदाचा ५ वर्षांचा अनुभव
8 . सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक 04 जागासंबंधित पदाचा ५ वर्षांचा अनुभव
9 . लघुलेखक (उ.श्रेणी) 01 जागासंबंधित पदाचा ५ वर्षांचा अनुभव
10 . लघुलेखक (नि.श्रेणी)01 जागासंबंधित पदाचा ५ वर्षांचा अनुभव
11 . प्रमुख भूमापक 03 जागासंबंधित पदाचा ५ वर्षांचा अनुभव
12 . भूमापक 01 जागासंबंधित पदाचा ५ वर्षांचा अनुभव


सुप्रीम कोर्ट भरती; 80 हजार पगार

MIDC Recruitment Application Process:

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने midc राबविण्यात येणाऱ्या या भरती अंतर्गत उमेदवारांना ऑनलाइन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. जे उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणार आहेत त्यांनी अंतिम तारखेच्या आत औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे.

midc recruitment maharashtra अंतर्गत जर उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू इच्छित असेल तर त्यांनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या ईमेल आयडीवर त्यांचा अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी- gmhrd@midcindia.org

tech info marathi

वरील ई-मेल पत्त्यावर सुद्धा उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत आहे.

उमेदवारांनी त्यांचा अर्ज संपूर्ण माहितीसह तसेच अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच अनुभव प्रमाणपत्र जोडायचे आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती उमेदवारांची निवड पद्धत 

Midc bharti अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारे होणार आहे. या भरती अंतर्गत जी मुलाखतीची तारीख ठरवून देण्यात आलेली आहे त्या तारखेला मुलाखती उमेदवारांना हजर राहायचे असून मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

भरती अंतर्गत मुलाखत कधी होणार?

मित्रांनो महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एमआयडीसी यांच्या वतीने राबविण्यात येणारी ही MIDC Bharti प्रक्रिया ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने राबविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत मुलाखतीची तारीख ही 27 डिसेंबर 2022 आहे. 27 डिसेंबर 2022 ला दुपारी 3.00 वाजता मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.

या midc recruitment अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना मुलाखत देऊन त्यांची निवड करून घ्यावी लागेल. एमआयडीसी च्या वतीने या भरती अंतर्गत मुलाखतीच्या तारखे मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केल्यास सदर उमेदवारांना ईमेलच्या माध्यमातून किंवा कॉल करून कळवण्यात येईल.

एमआयडीसी भरती अधिकृत नोटिफिकेशन:

एमआयडीसी भरतीची अधिकृत Notification ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या सदर पात्र उमेदवारांनी भरती संदर्भातील अधिकृत नोटिफिकेशन वाचून घ्यावी नंतरच अर्ज करावा.

भरतीची नोटिफिकेशन डाऊनलोड करा- 

MIDC Recruitment अटी शर्ती व पात्रता :

1. या भरती अंतर्गत उमेदवार ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पैकी एकाच पद्धतीने अर्ज करू शकतात.

2. संबंधित पदानुसार अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

3. या भरती अंतर्गत जे उमेदवार मुलाखतीकरिता अनुपस्थित राहतील त्यांची निवड करण्यात येणार नाही, त्यांना पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात येणार नाही.

4. ही भरती करार पद्धतीने असून सुरुवातीला उमेदवारांना 11 महिन्याकरिता कामावर ठेवण्यात येणार आहे. उमेदवारांची काम करण्याची पद्धत तसेच आवश्यकता पाहून उमेदवारांच्या नियुक्तीचे नूतनीकरण करण्यात येऊ शकते.

5. जेव्हा उमेदवारांची भरती अंतर्गत निवड होईल त्यांना हमीपत्र सादर करावे लागेल.

6. या भरती अंतर्गत उमेदवारांनी अर्ज हा संपूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करायचा आहे. अपूर्ण असलेले अर्ज रद्द करण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईट

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ भरती संदर्भातील माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटत असेल. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. भरती विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment