यावर्षी मराठवाडा पाऊस नसण्याचे हे आहे मुख्य कारण, जून संपला तरी पावसाची प्रतीक्षा कायमच | Marathavada Paus 

मागील काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस पोहोचलेला आहे असे सांगण्यात आलेली होते परंतु याबरोबरच मराठवाड्यामध्ये सुद्धा पूर्वी मान्सूनचे आगमन झालेले असताना चांगला पाऊस झाला, परंतु त्यानंतर मात्र पावसामध्ये सातत्य नसल्याने शेतकऱ्यांना एक प्रकारची चिंता लागलेली आहे, व मुख्य बाब म्हणजे जून महिना संपलेला असून जुलै महिना चालू झालेला असताना सुद्धा प्रतीक्षा पावसाची ही कायमच आहे. व पावसाचा खंड पडण्याचे कारण तज्ञांनी सांगितल्यानुसार यावर्षी मुंबईकडून नैऋत्य मोसमी वारे आल्याने मराठवाड्यात पर्जन्यछायेच्या प्रभावामुळे जून मध्ये मान्सूनचा मोठा खंड पडलेला आहे. 

 

मानसून ने चांगल्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये हजेरी लावलेली होती व हा पाऊस असाच कायम राहणार अशा प्रकारची अपेक्षा होती, परंतु या अपेक्षेचा भंग होऊन पावसाचा मोठा खंड पडलेला आहे, कारण पावसामध्ये कोणत्याही प्रकारचे सातत्य उरलेले नाही तसेच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अगदी थोडेच दिवस पाऊस झाल्याने अगदी थोडे दिवस पावसाचे मोजले गेलेले आहे.

 

मराठवाड्यातील कोणत्याही भागामध्ये 10 मिलिमीटर पेक्षा जास्त पंधरा दिवसांमध्ये कोणत्याही ठिकाणी पाऊस पडला नाही, पर्जन्य दिवस हा दहा मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला तरच समजला जातो व मराठवाड्यात दहा मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला नसल्याने झालेल्या पावसातील दिवस पर्जन्य दिवस मधून मोजले जाणार नाही. त्यामुळेच मराठवाड्यात मान्सून मध्ये खंड समजला गेलेला आहे, मराठवाड्यामध्ये पर्जन्यछायेच्या प्रदेशामुळेच पाऊस पडलेला नसल्याची कारणे सांगितली जात आहेत.

 

जर पाऊस कर्नाटक व गोव्यामधून मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झाला तर मात्र मराठवाड्यामध्ये समाधानकारक पाऊस पडतो, अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अगदी थोडेच दिवस पाऊस पडल्याने शेतकरी मात्र आता चिंतेत झालेले असून पाऊस कधी येणार? याची वाट बघत आहे. तर मराठवाड्यातील काही भागांमध्ये तर फक्त तीनच दिवस हे पावसाचे मोजले गेलेले आहे, अशा प्रकारची मराठवाड्यातील पावसाचे अपडेट अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5 हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार, शासनाचं अर्थसहाय्य मंजूर