मित्रांनो महावितरण च्या वतीने महावितरण विभाग पुणे यांच्या अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात ही प्रकाशित करण्यात आलेली असून या महावितरण भरती पुणे अंतर्गत इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची आवाहन करण्यात येत आहे. महावितरण च्या वतीने राबविण्यात येणारी ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांकरिता असून महावितरण भरती(mahavitaran bharti) अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच कागदपत्रे व पात्रता तसेच मिळणारा पगार व जाहिरात या संदर्भात विस्तृत माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
महावितरण विभागाच्या वतीने महावितरणच्या पुणे येथील कार्यालयाकरिता ही शिकाऊ उमेदवारांची mahavitaran bharti प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांना महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज तसेच विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. ज्या उमेदवारांना MahaVitaran Bharti अंतर्गत महावितरण तर्फे शासकीय नोकरी मिळवायची होती त्या उमेदवारांकरिता महावितरण सोबत काम करण्याची ही एक चांगली संधी चालून आलेली आहे. महाराष्ट्र राज्यात वीज पुरवठा करणारी महावितरण ही सर्वात मोठी कंपनी आहे. MahaVitaran Bharti Pune
महावितरण भरती विभाग पुणे अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख:
मित्रांनो महावितरण विभाग पुणे च्या वतीने राबविण्यात येणारी शिकाऊ उमेदवारांची mahavitaran bharti प्रक्रिया ही सुरू झालेली असून जर तुम्ही महावितरण भरती अंतर्गत पात्र असाल तर तुम्हाला महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने 6 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे. महावितरण भरती पुणे अंतर्गत अर्ज करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. MahaVitaran Bharti Pune
महावितरण भरती पदांचा तपशील mahavitaran bharti 2022:
एकूण उपलब्ध जागा: 37 जागा
पदांचे नाव: वीजतंत्री/तारतंत्री
नोकरी ठिकाण: पुणे विभाग
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
अंतिम तारीख: 6 जानेवारी 2023
भरती प्रकार: शिकाऊ उमेदवार भरती
वयोमर्यादा: कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त 30 वर्षे. जर उमेदवार मागासवर्गीय असेल तर त्यांच्यासाठी वयोमर्यादा ही 35 वर्षे आहे.
वेतन: शासनाच्या नियमानुसार शिकवू उमेदवारांकरिता ठरवून देण्यात आलेली वेतन.
महावितरण भरती पुणे अंतर्गत शैक्षणिक पात्रता:
मित्रांनो महावितरण विभाग पुणे यांच्या अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची जी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, त्यांच्यासाठी शैक्षणिक अहर्ता ही खालील प्रमाणे असणार आहे. MahaVitaran Recruitment 2022
- उमेदवार हा दहावी पास असला पाहिजे त्याचबरोबर उमेदवार हा ITI पास असायला पाहिजे.
- उमेदवार हा बारावीची परीक्षा पास असायला पाहिजे किंवा त्या बरोबरीची परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे.
- राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT)नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.MahaVitaran Recruitment
भारतीय नौदल भरती मार्फत अग्नीवीर पदांच्या 1500 जागांकरिता भरती सुरू
कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी पत्ता:
मित्रांनो या Mahavitaran bharti पुणे विभाग अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल अशा विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेनंतर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल. महावितरण भरती अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची कागदपत्रांची पडताळणी ही खालील पत्त्यावर जाऊन करून घ्यावी लागेल. कागदपत्रे पडताळणीचा पत्ता खाली दिलेला असून ऑफलाइन पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
कागदपत्र पडताळणी पत्ता:
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय म.रा.वि. वि. कं. मर्या., बाणखेले इमारत, दुसरा मजला, विकास थिएटर जवळ, मंचर ,तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे
3826 पदांसाठी तलाठी भरती 2023 सुरू; नवीन GR आला
महावितरण भरती आवश्यक कागदपत्रे:
महावितरण विभाग पुणे यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शिकाऊ उमेदवारांची भरती अंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- दहावी उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र
- बारावी उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र
- ITI प्रमाणपत्र
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड
इत्यादी कागदपत्रे महावितरण विभाग भरतीचे अंतर्गत उमेदवारांना त्यांची निवड करण्याकरिता आवश्यक असणार आहे. जर याव्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र आवश्यक असतील तर विद्यार्थ्यांनी अधिकृत जाहिरात वाचून त्यानुसार कागदपत्रे पडताळणी करिता न्यावी. या कागदपत्रांची पडताळणी विद्यार्थ्यांना त्यांची निवड झाल्यानंतर करून घ्यावी लागेल. विद्यार्थी कागदपत्र पडताळणी मध्ये पात्र ठरल्यास नंतरच विद्यार्थ्यांची शेवटची निवड करण्यात येईल. MahaVitaran Bharti Pune
महावितरण भरती अंतर्गत अर्ज कसा करायचा?
मित्रांनो महावितरण विभाग पुणे यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या Mahavitaran Recruitment शिकाऊ उमेदवारांच्या भरती करिता विद्यार्थ्यांना खालील दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची जर निवड झाली तर त्यांना ऑफलाईन पद्धतीने त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.
महावितरण भरती अर्ज करण्याची लिंक-
महावितरण भरती पुणे विभाग अधिकृत जाहिरात:
मित्रांनो महावितरण भरती पुणे विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शिकवू उमेदवारांच्या भरती करिता महावितरण ची अधिकृत जाहिरात आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे, त्या लिंक वर क्लिक करून ती जाहिरात वाचून घ्या नंतरच अर्ज करा.
Notification डाऊनलोड करण्यासाठी लिंक
महावितरण भरती उमेदवारांकरिता सूचना Instructions for Mahavidran Recruitment Candidates:
महावितरण विभागाच्या भरती अंतर्गत विद्यार्थ्यांना जर अर्ज करायचा असेल तर त्यापूर्वी त्यांनी या सूचना वाचून घेतल्यास पाहिजे.
- विद्यार्थ्यांना महावितरण विभागाच्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अंतिम तारखेच्या आत पाठवणे आवश्यक आहे.
- अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून ठरवून दिलेल्या वेळेच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे. अंतिम तारीख संपल्यानंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- विद्यार्थ्यांनी आयटीआयचे प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक असून विद्यार्थ्यांना त्यांचे आयटीआय मधील चार सेमिस्टर चे गुण एकत्रितपणे नोंदवून पाठविणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांनी जर त्यांच्या आयटीआय मधील चार सेमिस्टर पैकी कोणत्याही एका सेमिस्टर चे गुण पाठवल्यास, तो अर्ज अपात्र ठरेल त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्व सेमिस्टर चे गुण एकत्रितपणे पाठवावे.
- विद्यार्थ्यांची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार असून ज्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल, त्यांना कागदपत्र पडताळणी करिता स्वखर्चाने दिलेल्या पत्त्यावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे.
- ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना कागदपत्रे पडताळणी करण्याकरिता तारीख व वेळ ही त्यांच्या ईमेल ऍड्रेस वर पाठवण्यात येईल.
- महावितरण शिकाऊ उमेदवार भरती अंतर्गत पद संख्येमध्ये बदल करण्याचे तसेच भरती प्रक्रियेमध्ये बदल करण्याचे अधिकार हे महावितरण विभागाकडे राखून ठेवण्यात आलेले आहे.