अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहे परंतु प्रत्येकाला नोकरी मिळवणे हे अशक्य आहे, त्यामुळे तरुणांचा कल उद्योगधंद्यांकडे जाऊ लागला आहे, त्यामुळे तरुण उद्योगधंदे करून चांगल्या प्रमाणात आपले करिअर घडवू शकतात.
तरुणांची इच्छा असताना सुद्धा काही तरुण असे असतात की ज्यांच्याकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्यामुळे त्यांना, उद्योग धंदे करण्यासाठी मुकावे लागते. व अशातच तरुणांसाठी काही महत्त्वाच्या योजना आहे, त्या योजनेअंतर्गत तरुण तब्बल 15 लाखापर्यंतचे कर्ज मिळवून आपला स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतात.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अनेक तरुण लाभ घेऊ शकणार आहे, व स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहेत. त्यामुळे ज्या तरुणांना उद्योगासाठी कर्ज हवे आहे, असे तरुण अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत लाभ घेऊन व्यवसाय चालू करू शकतात.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत तीन प्रकारच्या कर्ज योजना राबविल्या जातात, व त्या योजनेतील तरुण व्यवसाय चालू करू शकतात. व या योजनेतील मुख्य बाब म्हणजे योजनेअंतर्गत लाभ घेणारा व्यक्ती हा मराठा समाजाचा असावा.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत तिने योजना राबविण्यात येतात व योजनेअंतर्गत मराठा समाजाचे तरुण लाभ घेऊ शकतात.
1. गट कर्ज व्याज प्रतिपूर्ती योजना
2. वैयक्तिक कर्ज व्याज प्रतिपूर्ती योजना
3. गट प्रकल्प कर्ज
वरील तीन योजनांचा समावेश अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनात आहे. व या योजनेअंतर्गत तरुणांना साधार लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते.
योजनेच्या अधीकृत वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
योजनेची संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया यांच्या माहिती करिता इथे क्लिक करा