कापूस, सोयाबीन, गहू त्यासह मका पिकाचे दर काय आहे? दर वाढीबाबत तज्ञांचे मत व्यक्त | Kapus Dar 

देशामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेतले जाते, महाराष्ट्रातील विदर्भामध्ये कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, परंतु मागील खरीप हंगाम मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केलेली असून शेतकऱ्यांच्या कापसाला हंगामाच्या सुरुवातीपासूनच कोणत्याही प्रकारे चांगला दर मिळालेला नाही आहे, व त्यामुळे जे शेतकरी पैशाने चांगल्या स्थितीमध्ये आहे अशा शेतकऱ्यांनी कापसासह इतरही पिकांची साठवणूक करून ठेवलेली आहे तसेच सोयाबीन पीक त्यासह गहू व मका पिकाला सध्याच्या स्थितीमध्ये काय दर चालू आहे हे सुद्धा खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 

 

खरीप हंगाम 2024 मधील हमीभाव कापसाला सात हजार पाचशे रुपये पर्यंतचा आहे परंतु मागील वर्षी हा दर कमी होता परंतु हमीभावापेक्षा सुद्धा कमी दरामध्ये सुरुवातीला कापूसाची विक्री केली गेली परंतु आता मात्र 7200 ते 7600 रुपये असा दर कापसाला मिळताना दिसतो परंतु या कापूस दरवाढीचा फायदा मात्र खूप कमी शेतकऱ्यांना होणार आहे परंतु 7600 पर्यंतचा दर हा काही जास्त नसून शेतकऱ्यांना यात काहीही उरत नाही आहे कारण शेतीवर म्हणजेच मुख्यतः कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो, व त्या खर्चाला सुद्धा या दरामधून वेगळे काढणे कठीण झालेले आहे.

 

सोयाबीनला सुरुवातीपासूनच खूप कमी दर मिळालेला आहे परंतु दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केलेली आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांकडे मागील वर्षीचे सोयाबीन साठवून ठेवलेले आहे, याचा मुख्य उद्देश म्हणजे सोयाबीनचे दर वाढेल हा असून सोयाबीनला मिळत असलेला दर 4100 ते 4500 रुपये एवढा मिळत आहे. व सोयाबीनला अशाच प्रकारचा दर टिकून राहणार अशा प्रकारचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलेला आहे.

 

देशामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाला मागणी आहे तसेच सध्याच्या स्थितीमध्ये गव्हाला मिळत असलेल्या दर 2400 ते 2900 रुपये एवढा वेळ आहे तसेच अभ्यासाकांच्या मते गव्हाला मिळत असलेला दर हा कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मक्याला मिळत असलेला दर 2200 ते 2600 रुपये एवढा दर मिळत आहे, परंतु येणाऱ्या काही दिवसात मक्याच्या दरामध्ये अजूनही सुधारणा होऊ शकतात, अशा प्रकारे विविध प्रकारच्या पिकाला मिळत असलेला दर वरील प्रमाणे आहे.

 

टोमॅटोच्या दरात वाढ परंतु पुढील आठवड्यात टोमॅटोचे दर कमी होण्याची शक्यता