नगर परिषद जालना भरती; नवीन जाहिरात आली | Jalna Nagar Parishad Bharti

मित्रांनो जालना नगर परिषदेच्या मार्फत विविध पदांकरिता भारतीची जाहिरात काढण्यात आलेली आहे. जालना नगरपरिषद अंतर्गत स्थापत्य अभियंता व माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ या पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. Jalna Nagar Parishad Bharti अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर चला जाणून घेऊया या भरती प्रक्रिया संदर्भात विस्तृत माहिती.

या Nagar Parishad Jalna Bharti अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज हा आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करायचा आहे. अर्ज हा नगर परिषदेच्या वतीने ठरवून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. उमेदवारांना अर्जासोबत त्यांची सर्व शैक्षणिक तसेच इतर सर्व कागदपत्रे पाठवायचे आहे. त्याचबरोबर जर अर्जदाराकडे अनुभव प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा उमेदवारांनी अर्ज करताना पाठवायचे आहे.

जालना नगरपरिषद भरती तपशील:

एकूण जागा: 02

पदांची नाव:

1. स्थापत्य अभियंता

2. माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ

शैक्षणिक पात्रता: पदवीत्तर पदवी तसेच एमएससीआयटी आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ज्ञान

अर्ज कधी सुरू झाले: 13 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2022

अर्ज फी: नाही

वेतन:

1. पद क्रमांक एक म्हणजेच स्थापत्य अभियंता यांना 45 हजार रुपये दरमहा वेतन असणार आहे.

2. पद क्रमांक दोन म्हणजेच माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ यांना दरमहा 35 हजार रुपये वेतन असणार आहे.

अर्ज कसा आणि कुठे करायचा?:-

मित्रांनो नगरपरिषद जालना यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या Jalna Nagar Parishad Recruitment अंतर्गत इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच अनुभव प्रमाणपत्र जोडून खालील पत्त्यावर पाठवायचा आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवार स्वतः जाऊन अर्ज ऑफलाईन जमा करू शकतात किंवा पोस्टाच्या माध्यमातून सुद्धा हे अर्ज पाठवू शकतात. पोस्टाच्या माध्यमातून या भारतीय अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांकरिता सूचना म्हणजे तुमचे अर्ज अंतिम तारखेच्या आत पत्त्यावर पोहोचतील याची दक्षता घ्यावी. पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज हे सीलबंद लिफाफा मध्ये पाठवायचे आहेत.

अर्ज पत्ता:

नगरपरिषद कार्यालय जालना

या भरती अंतर्गत खालील प्रमाणे अनुभव पाहिजे:-

1. जर अर्जदार हा स्थापत्य अभियंता या पदाकरिता अर्ज करत असेल तर त्यांच्याकडे बांधकाम आणि पर्यवेक्षण क्षेत्रामध्ये कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे.

2. तसेच यापूर्वी जर नगरपरिषद किंवा महानगरपालिकेमध्ये काम केलेले असेल तर त्याबाबत अनुभव असायला पाहिजे. असल्यास त्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे त्यांनी अर्जासोबत प्रमाणपत्र जोडायचे आहे.

जालना नगरपरिषद भरती जाहिरात:

मित्रांनो जालना नगरपरिषद यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्थापत्य अभियंता आणि माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ या पदांकरिता भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. भरती संदर्भात अधिक आणि विस्तृत माहिती जाहिरातीमध्ये नमूद केलेली असल्यामुळे सदर पात्र व अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात एक वेळा अवश्य वाचून घ्यावी. भरतीची अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरात डाऊनलोड करू शकतात. जालना नगर परिषद यांच्या वतीने प्रकाशित केलेल्या अधिकृत जाहिरातीमध्ये या भरती संदर्भात सर्व अटी व शर्ती तसेच पात्रता नमूद करण्यात आलेली आहे.

Notification डाऊनलोड करा 

नगरपरिषद जालना भरती अंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया:

मित्रांनो Jalna Nagar Parishad Recruitment अंतर्गत ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे. त्या सर्व उमेदवारांच्या अर्जाची सुरुवातीला छाननी करण्यात येईल छाननी प्रक्रिये दरम्यान जे अर्ज पातळ ठरतील, त्या अर्जदारांना मुलाखत द्यावी लागेल. मुलाखतीची वेळ आणि दिनांक पात्र अर्जदारांना कळविण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेऊन पात्र उमेदवारांना नोकरी देण्यात येईल.

जालना नगरपरिषद भरती अंतर्गत उमेदवारांकरिता सूचना:

1. या या भरती प्रक्रिया अंतर्गत उमेदवारांची निवड ही केवळ 11 महिन्यांसाठी असणार आहे.

2. जालना नगरपरिषद यांच्यावतीने राबविण्यात येणारी ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची आहे.

3. या भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेचे पुरेपूर ज्ञान असणे आवश्यक आहे.

4. या भरती अंतर्गत अर्ज करताना उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा चालू नंबर तसेच स्वतःचा चालू ईमेल आयडी द्यावा. भरती संदर्भात पुढील माहिती उमेदवारांना त्यांच्या ईमेलवरच मिळणार आहे.

5. या भरतीच्या पदांमध्ये बदल करण्याचे तसेच भरतीच्या प्रक्रियेत बदल करण्याचे संपूर्ण अधिकार हे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 1744 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरू

जालना नगर परिषदेच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या Nagar Parishad Jalna संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट करून नक्की कळवा. अश्याच प्रकारच्या महत्वपूर्ण अश्या भरती संदर्भातील माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment