मित्रांनो हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्या वतीने 290 रिक्त जागांकरिता भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून जर तुम्ही दहावी पास उमेदवार असाल तरीसुद्धा तुम्हाला या भरती अंतर्गत अर्ज करता येत आहे. HCL च्या वतीने राबविण्यात येणारी ही पदभरती प्रक्रिया अप्रेंटिस म्हणजे शिकाऊ उमेदवार म्हणून भरती होणार आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 19 डिसेंबर 2022 आहे. चल चला जाणून घेऊया या Hindustan Copper Recruitment संदर्भात विस्तृत माहिती.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड ही महत्त्वपूर्ण अशी कंपनी असून या कंपनीच्या वतीने प्रशिक्षणार्थी भरती राबविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र असलेल्या संपूर्ण भारत देशातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. Hindustan Copper Recruitment 2022 अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही सुरुवातीला 12 डिसेंबर होती परंतु आता अंतिम तारीख ही 19 डिसेंबर करण्यात आलेली आहे.
HCL Recruitment Detail:
एकूण पदसंख्या: 290
पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी
वयोमर्यादा: 18 ते 30 वर्ष (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाला पाच वर्षे सूट तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गाला तीन वर्षे सूट)
अर्ज फी: नाही
शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण तसेच संबंधित पदानुसार त्या त्या ट्रेड मध्ये आयटीआय
नोकरीचे ठिकाण: राजस्थान
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धत
अर्ज करण्याची अंतिम तारीख: सुरुवातीला 12 डिसेंबर होती, ती आता वाढून 19 डिसेंबर 2022 आहे.
पदांचा तपशील व पदानुसार रिक्त जागा:
या हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती (Hindustan Copper Recruitment 2022) अंतर्गत एकूण 290 रिक्त जागांकरिता तेरा पदे आहेत. त्यांची माहिती खालील प्रमाणे आहे.
ब्लास्टर (माइन्स) 100 रिक्त जागा, मेट (माइन्स) 60 रिक्त जागा, फिटर 30 रिक्त जागा, मेकॅनिक डिझेल 10 रिक्त जागा, इलेक्ट्रिशियन 40 रिक्त जागा, टर्नर 05 रिक्त जागा, कोपा 02 रिक्त जागा, ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 02 रिक्त जागा, वेल्डर (G &E) 25 रिक्त जागा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 06 रिक्त जागा, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 03 रिक्त जागा, सर्व्हेअर 05 रिक्त जागा, Reff & AC रिक्त जागा अशा एकूण 13 पदांकरिता 290 रिक्त जागा उपलब्ध आहेत. वरील Hindustan Copper Vacancy 2022 पदांपैकी ज्या पदाकरिता तुम्ही पात्र आहात जसे की तुम्ही वरीलपैकी कोपा या विषयांमध्ये आयटीआय केलेला असेल तर तुम्ही कोपा या पदाकरिता पात्र असून याच पदाकरिता तुम्ही अर्ज करावा. अशाप्रकारे विविध पदांकरिता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
HCL Bharti अधिकृत जाहिरात:
Hindustan Copper Ltd Bharti अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पद भरतीची अधिकृत जाहिरात ही www.hindustancopper.com या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भारतीय अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वेबसाईटवरील अधिकृत जाहिरात नक्की वाचून घ्यावी व आपण ज्या पदाकरिता या भरती अंतर्गत पात्र ठरत आहोत, त्याच पदाकरिता अर्ज करावा.
भरतीची जाहिरात आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत खाली दिलेल्या लिंक वरून ती जाहिरात डाऊनलोड करून घ्यावी.
हिंदुस्तान कॉपर भरती अंतर्गत अर्ज कसा करायचा? How to Apply For Hindustan Copper Recruitment 2022
मित्रांनो या Hindustan Copper Bharti अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाच्या सर्व अटी व शर्ती तसेच पात्रता वाचून घ्याव्या नंतरच अर्ज करावा. तसेच उमेदवारांनी अर्ज हा पूर्ण भरावा अपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार नसून अर्ज भरताना अचूक माहिती द्यावी अर्जामध्ये चुकीची माहिती आढळून आल्यास तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल त्यामुळे अंतिम तारखेच्या आत लवकरात लवकर अचूक माहिती निहाय अर्ज सादर करा.
उमेदवारांकरिता सूचना:
1. ही पद भरती अप्रेंटिस स्वरूपाची आहे. या पदभरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची प्रशिक्षणार्थी म्हणून ओळख राहील.
2. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेच्या आत करायचा आहे.
3. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी व त्यानुसार अर्ज करावा.
4. अर्जामधील माहिती अचूक असली पाहिजे.
Notification डाऊनलोड करण्याची लिंक-
Hcl Bharti संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अश्याच नोकरी विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.