पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान अंदाज | Havaman Andaj 

राज्यामध्ये अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झालेली असून, राज्यातील विविध भागांमध्ये येत्या दहा तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे, गेल्या काही दिवसांनी पासून राज्यामध्ये भाग बदलत अनेक भागात पाऊस पडलेला आहे, पण ज्या भागांमध्ये पाऊस पडलेला नसेल त्या भागातील नागरिकांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या येणारा पावसामुळे अत्यंत दिल्यासा मिळू शकतो, कारण पुढील दहा तारखेपर्यंत पावसाची शक्यता जास्त वर्तविण्यात आलेली आहे. 

 

हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठीचा अत्यंत महत्त्वाचा अंदाज घेण्यात आलेला आहे, कारण गेल्या काही दिवसांत काही भागात पाऊस पडला नाही त्यामुळे एक प्रकारे शेती पिकावर संकट वाढवलेली होती, तसेच शेतकऱ्यांची पेरणी होऊन त्यावर पाऊस नाही आला त्यामुळे पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवलेले होते, अशा स्थितीमध्ये आता राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे.

 

पावसाच्या अंदाजानुसार मराठवाड्यामध्ये 12 ते 18 तारखेपर्यंत पडणारा पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त असणार आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये सहकारी मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून, त्यामध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर मध्ये मध्यम पाऊस, छत्रपती संभाजीनगर आणि जालना, हिंगोली अशा ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

 

राज्यातील अहमदनगर, पुणे,सातारा, सांगली, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, कोल्हापूर, सोलापूर, दक्षिण चांदवड, कोकण, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि विदर्भातील काही भाग- रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशाप्रकारे विविध जील्ल्यांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, अशाप्रकारे हवामान अभ्यासकांकडून अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आलेला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तर अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेले असून काही भागात पाऊसाने सुरुवात केलेली आहे.

 

शेतकऱ्यांनो तुमचे सोयाबीन पिवळे पडले का? लगेच हे व्यवस्थापन करा