शासनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना शासनाच्या माध्यमातून राबविल्या जातात व अशाच प्रकारची एक योजना जी शासनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती नव बौद्ध या प्रवर्गातील नागरिकांसाठी दुधाळ गाई म्हशींचे गट वाटप केले जाणार आहे व याच योजनेचे नाव दुधाळ जनावर गट पुरवठा योजना असे आहे, योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना एक प्रकारचा व्यवसाय चालू करता यावा याकरिता प्रयत्न करणे तसेच दुधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ करून नागरिकांची उत्पादन वाढवणे हा उद्देश आहे.
योजनेच्या माध्यमातून दोन दुधाळ गाई अथवा म्हशी घेण्यासाठी 75 टक्के एवढे अनुदान दिले जातील, तसेच या योजनेअंतर्गत एक हेक्टर पेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे , कारण अशा शेतकऱ्यांना एक प्रकारचा व्यवसाय दुधाळ गाई म्हशींचा चालू करता येईल, व त्यांच्या उत्पादनात सुद्धा भर पडून त्यांचा विकास लवकरात लवकर साधला जाऊ शकतो, व त्यांना चांगल्या प्रमाणात उत्पादन मिळू शकते.
योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी नागरिकांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, त्यानंतर 75 टक्के एवढे अनुदान दिले जाईल, व उर्वरित असलेली रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. अर्ज प्रक्रिया जिल्हा पशुसंवर्धन विभागामध्ये करावी लागणार आहे, त्यामध्ये उत्पन्नाच्या दाखल्यासह इतरही आधार कार्ड अशा प्रकारची काही आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून जमा करावे ज्यावेळी लाभार्थ्याची निवड केली जाईल अशावेळी 75 टक्के एवढे अनुदान दिले जाईल व उर्वरित असलेली रक्कम शेतकऱ्याला भरावी लागणार आहे, अशा प्रकारे दुधाळ जनावरांचे वाटप दुधाळ जनावर गट पुरवठा योजनेअंतर्गत केले जाईल.
रेशन कार्ड धारकांना मिळणार या सणानिमित्त आनंदाचा शिधा, मिळणार एवढ्या वस्तू