28 जून 2023 ला बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठीचे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांचे हित साधले जावे हाच उद्देश पुढे होता, त्याचबरोबर सेंद्रिय शेतीला मजबुती होईल यादृष्टीने निर्णय घेण्यात आले. व त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी 3 लाख 70 हजार 128 कोटी रुपयांच्या यांच्या पॅकेजला मंजुरी देण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे युरियावर सबसेडी सुरू राहणार आहे, असे जाहीर केले, 242 रुपयांनी 45 किलो ची युरियाची बॅग उपलब्ध होणार असून एकूण तीन लाख 17 हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली,त्याचबरोबर हा निधी तीन वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. त्याचबरोबर खताच्या किमती जागतिक स्तरावर सुद्धा किमती मोठ्या पटीने वाढत आहे, व यासाठी कच्च्या मालाच्या किमतीमध्ये होणारी वाढ कारणीभूत आहे, परंतु केंद्र सरकारने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना मात्र कमी दरामध्ये उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे खताच्या अनुदानामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे.
त्यामुळे केंद्र सरकार अंतर्गत घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले,असून यामुळे शेतकऱ्यांचे भलेच साधणार आहे. त्याचबरोबर आता त्यामुळे शेतकऱ्यांना 242 रुपयात 45 किलो ची बॅग उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या खरीप हंगामासाठी एकूण 38 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर, विहीर अनुदान योजनेअंतर्गत जाचक अटी रद्द