Fellowship Scheme: अनुसूचित जाती (SC ) आणि अनुसूचित जमाती(ST) च्या विद्यार्थ्यांना दरमहा 15 हजार रु शिष्यवृत्ती

अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविण्यात येतात, वेगवेगळ्या योजनांद्वारे विद्यार्थ्यांचे भले सुद्धा साधता यावे व विद्यार्थ्याला शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागू नये, हा प्रयत्न असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविण्यात येत असल्या, तरीसुद्धा अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांना या राबविण्यात येणाऱ्या योजनांबद्दल माहिती नसते, व माहितिच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना सुवर्णसंधीला मुकावे लागते. व याच कारणाने विद्यार्थ्याला राबविण्यात येणाऱ्या फेलोशिप योजनांची माहिती असणे आवश्यक असते.

विद्यार्थ्यांसाठी एक योजना राबविण्यात येते व ती योजना एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी आहे व ती योजना म्हणजेच राजीव गांधी नॅशनल योजना होय. पुढच्या शिक्षणातील संशोधनाला चालना देण्याचा उद्देश पुढे ठेवूनच ही योजना राबविण्यात येते

एसएससी, एसटी विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येते.

यामध्ये विद्यार्थ्यांची निवड केली जाते त्यामध्ये अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यांची संख्या 667 निवडले जाते. तर अनुसूचित जातीच्या विद्यार्थी 1333 असते. व या विद्यार्थ्यांना पीएचडी संशोधनासाठी वेगवेगळे विषयांसाठी विद्यार्थ्यांना फेलोशिप दिल्या जाते. विद्यार्थ्यांना महिन्याला 15 हजार रुपये दिल्या जाते व यामधून विद्यार्थी शिक्षण पूर्ण करू शकतात.

त्याप्रमाणे विद्यार्थी यामध्ये अर्ज करून विद्यार्थी लाभ घेऊ शकतात. काही पात्रता असणे आवश्यक ठरते, त्यामुळे विद्यार्थ्याला पदव्युत्तर शिक्षण आवश्यक असल्याने शिक्षण संस्थेत नोंदणी केलेली असावी त्याचप्रमाणे विद्यार्थी अर्ज करण्यासाठी यूजीसी वेबसाईटवर जाऊन लिंक डाऊनलोड करून अर्ज करू शकतात. व अर्ज विद्यापीठ किंवा संस्थेमध्ये सादर करावा लागतो. अशाप्रकारे अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी नॅशनल फेलोशिप ही महत्त्वाची ठरू शकते.

Fellowship Scheme: अनुसूचित जाती (SC ) आणि अनुसूचित जमाती(ST) च्या विद्यार्थ्यांना दरमहा 15 हजार रु शिष्यवृत्ती

राज्य शासनाचा मोठा निर्णय! आता 5 वी- 8 वी च्या वार्षिक परीक्षा होणार; 8 पर्यंत पास करण्याचा नियम रद्द