शेतकऱ्यांची विविध क्षेत्रांमध्ये व्यापाऱ्यांकडून किंवा दुकानदारांकडून फसवणूक होते, मात्र शेतकऱ्यांची फसवणूक टाळता यावी याकरिता शासनांतर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याचबरोबर या निर्णयामध्ये शेतकऱ्यांचे हित साधले जावे हाच उद्देश आहे. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी होणारी फसवणूक सुद्धा या निर्णयामुळे टाळली जाईल.
शेतकरी पावसाची वाट बघत खरीप हंगामाला सुरुवात करत आहेत, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बी बियाणे खरेदी केलेले आहे, व खरिप हंगामाला सुरुवात होईल. अशा वेळेस शेतकऱ्यांची दुकानदारांकडून फसवणूक होते, शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारली जातात. अशावेळी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना योग्य व काळजीपूर्वक संपूर्ण बियाण्यांची खरेदी करायला हवी.
बियाणे खरेदी करताना त्यावरील किंमत तपासायला हवी, तसेच खरेदी करताना कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये याची काळजी शेतकऱ्यांनी बियाणे तसेच शेती विषयक वस्तू किंवा सामान खरेदी करताना घ्यायला हवी.
तुम्हाला माहित आहे का? तुमच्या गावातील सरपंच आणि उपसरपंचाला किती पगार मिळतो
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
शेतकऱ्यांच्या फसवणुकीला टाळण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बियाण्यांची जास्त दराने विक्री थांबवण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये पतके तयार करून त्यांना छापे टाकण्याचे आदेश दिलेले आहे. त्याचबरोबर जर बियाण्याची विक्री अधिक किमतीमध्ये केली जात असेल तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या अर्थातच हिताचा ठरेल.
व्यवसाय चालू करायचा आहे? तरुणांसाठी महत्त्वाची योजना, तरुणांना मिळेल तब्बल 15 लाख रुपये