दूध उत्पादकांना मिळणार प्रती लिटर 30 रुपये, व 5 रुपये अनुदान | Dudh Anudan 

मंत्रिमंडळ निर्णयामध्ये विविध प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य महिलांपर्यंतचे निर्णय घेण्यात आलेले असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, दुधाला मातीमोल पाण्यासारखा दर मिळत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीही नफा मिळत नाही आहे, त्यामुळे त्यांना दूध उत्पादन घेणे परवडावे याकरिता दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, व त्यानुसार एक जुलैपासून दुध उत्पादकांना अनुदानाचा लाभ दिला जाणार होता. 

 

दूध उत्पादकांच्या दुधाला तीस रुपये दर व पाच रुपये एवढे अनुदान देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे, विखे पाटील यांनी राज्यभरातील सहकारी व खाजगी दूध उत्पादक संघ तसेच शेतकरी यांची तातडीने बैठक बोलावण्यात आलेली होती व त्या बैठकीमध्ये, विखे पाटलांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या त्या पूर्णतः समजून घेतलेल्या होत्या, व त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, व त्या अनुदानास मंजूरी सुद्धा देण्यात आलेली असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति 30 रुपये दर, अनुदान पाच रुपये याप्रमाणे अनुदान दिले जाईल.

 

विखे पाटलांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर दुधाला चांगला दर मिळावा याकरिता मंत्रिमंडळामध्ये उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती मांडली व त्यामुळे तुम्हाला त्याबरोबरच पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याने एकूण 35 रुपये प्रति लिटर एवढा दर शेतकऱ्यांना मिळत आहे, त्यामुळे एक प्रकारचा दिलासा दूध उत्पादन शेतकऱ्यांना दिला जाणार आहे, व या पाच रुपये अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे.

 

टोमॅटोच्या दरात मोठी वाढ, अजूनही टोमॅटोचे दर वाढण्याची शक्यता, शेतकरी होणार मालामाल